तेली भुता कावडीचे फलटणमध्ये स्वागत

संदिप कदम
मंगळवार, 27 मार्च 2018

फलटण शहर (जि.सातारा): शिखर शिंगणापुर येथे होणार्या शंभु महादेवाच्या यात्रेनिमित्त जलाभिषेक घालण्याचा प्रथम मान असणार्या तेली भुता कावडीचे आगमन फलटण येथे झाले. यावेळी तेली भुता कावडीचे  तहसिलदार विजय पाटील यांनी कावडीचे पुजन व स्वागत केले.

फलटण शहर (जि.सातारा): शिखर शिंगणापुर येथे होणार्या शंभु महादेवाच्या यात्रेनिमित्त जलाभिषेक घालण्याचा प्रथम मान असणार्या तेली भुता कावडीचे आगमन फलटण येथे झाले. यावेळी तेली भुता कावडीचे  तहसिलदार विजय पाटील यांनी कावडीचे पुजन व स्वागत केले.

हर हर महादेवाचा जय घोष करत हजारो कावडधारी भाविक सासवड भागातून येतात. फलटणकरांसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याइतकाच आनंदाचा सोहळा तेली भुता कावडीच्या आगमनावेळी अनुभवताना दिसतात. यावेळी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था, मंडळे सज्ज झालेली पाहण्यास मिळाली. सकाळच्या प्रहरात होणाऱ्या कावडीच्या आगमनामुळे जागोजागी चहा फराळ वाटप सुरु होते. 

कावडीचे आगमन जिंती नाका परिसरात होताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरवात केली.  जिंती परिसरातुन हरिबुवा मंदिर मार्गे कावडींचे शहरात आगमन झाले. यावेळी तहसिलदार विजय पाटील व नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांनी कावडीचे पुजन व स्वागत केले. यावेळी कावडीचे मानकरी कैलास उर्फ राजेंद्र काशिनाथ कावडे, सुनिल लक्ष्मण कावडे यांचेसह जयवंत काशिनाथ जगताप, संग्राम भिकाजी पाटील, प्रविण लक्ष्मण भोंडे यांच्या सह सासवड नगर पालिका भजनी मंडळ व कावड मंडळ सासवडचे सदस्य उपस्थित होते.

आज सकाळची न्याहरी झाल्यानंतर कावडी विडणी मार्गे बरड गावी रात्रीच्या मुक्कामासाठी जाणार आहे. तर यानंतर सकाळी (ता. २८) आंदरुड मार्गे काथळे येथे मुंगी घाटामार्गे शंभु महादेव मंदिराकडे जातील. कावडी सोबत आलेल्या भाविकांची गैरसोय तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: faltan tradition teli bhuta kawdi