लग्नातील आहेर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना

हेमंत पवार
शनिवार, 23 जून 2018

साकुर्डी येथील प्रगतशील शेतकरी आणि सेवानिवृत्त जवान नारायण सुर्वे यांची कन्या गौरी आणि वसंतगड येथील हणमंत जामदार यांचे चिरंजीव गणेश यांचा विवाह होता.

कऱ्हाड : लग्नामध्ये जमलेला आहेराचा समाजातील दुखितांचे अश्रू पुसण्यासाठी उपयोग व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून कराड तालुक्यातील साकुर्डीतील सुर्वे आणि वसंतगडच्या जामदार कुटुंबातील विवाहामध्ये जमलेला आहेर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतली. त्याबद्दल दोन्ही कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. 

साकुर्डी येथील प्रगतशील शेतकरी आणि सेवानिवृत्त जवान नारायण सुर्वे यांची कन्या गौरी आणि वसंतगड येथील हणमंत जामदार यांचे चिरंजीव गणेश यांचा विवाह होता. त्या विवाहामध्ये जमणाऱ्या आहेराच्या रकमेतून दुखितांचे अश्रू पुसले जावे यासाठी संबंधित रक्कम दान करण्याचा निर्धार केला. त्यानुसार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी त्यांना काही उपाय सुचवले. त्या दोन्ही कुटुंबांनी सामाजिक बांधिलकीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आहेराची रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला. 

त्यासाठी लग्नाच्या कार्यालयाबाहेरच गणपतीच्या मूर्तीसमोर अशी माहिती देणारा फलक लावून तेथील पेटीत आहेराची रक्कम दान करावी, असे लिहिन्यात आले होते. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, सुर्वे आणि जामदार कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: Family Gives Gift of Marriage to Suicidal Farmers Family