शेतकऱ्यांसाठी आता ‘ॲग्रोवन’ चर्चासत्रे - शिवेंद्रसिंहराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

सातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे दिली. 

जिल्हा बॅंकेतर्फे शेतकरी मंडळे व बॅंकेच्या शाखांत दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू करण्यात आले आहेत. याकरिताचा धनादेश आमदार भोसले यांनी ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक आमदार बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ‘ॲग्रोवन’चे वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक संजय जाधव, मधुकर जाधव, व्यवस्थापक सुजित शेख आदी उपस्थित होते. 

आमदार भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक कार्यरत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतीविषयक माहिती उपलब्ध व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.’’ 

श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘दैनिक ॲग्रोवनमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यापुढे शेतमालाची विक्री, प्रक्रिया उद्योग तसेच वनस्पती लागवड व विक्री व्यवस्था याविषयी शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन’ने मार्गदर्शन करावे.’’ 

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा बॅंक ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहकारात काम करणारी सर्वोत्कृष्ट बॅंक आहे. शेतकऱ्यांसाठी या 
बॅंकेच्या माध्यमातून भविष्यात शेती उत्पादनात वाढ, विक्री व्यवस्था, औषधी वनस्पती यांविषयी चर्चासत्रांचे संयुक्तरित्या अयोजन करू.’’ 

बॅंकेने नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट ३०० शेतकरी मंडळांना 
व जिल्ह्यातील सर्व शाखांना दैनिक ॲग्रोवनचे अंक सुरू केले आहेत. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे यांनी मार्गदर्शन केले. श्री. राजेंद्र सरकाळे यांनी आभार मानले.

Web Title: Farmer Agrowon Discussion Shivendrasinhraje Bhosale