विष पिऊन एका शेतकऱ्याची आत्महत्या

mane
mane

मोहोळ : शेती व घरावर काढलेले कर्ज कसे फेडायाचे, तसेच शेतातील बोअरचे पाणी संपल्याच्या निराशेतून, एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना, मंगळवारी (ता. 7) सकाळी साडेअकरा वाजता येणकी (ता. मोहोळ) येथे घडली. तुकाराम निवृत्ती माने वय 55 असे मृताचे नाव आहे.

कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तुकाराम यांनी शेती व घरावर कर्ज काढले होते. हे कर्ज कसे फेडायाचे, तसेच शेतातील बोअरचे पाणी ही संपले, या नैराश्यातून तुकाराम यांनी मंगळवारी विषारी कीटकनाशक प्राशन केले. तातडीने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, ते उपचारापूर्वी मयत झाले. या घटनेची नोंद कामती पोलिसात झाली असून, अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com