शेतकरी ते ग्राहक थेट "विकेल ते पिकेल' विक्री केंद्र सुरु 

Farmer to Consumer Direct "Sales to Pickle" Sales Center launched
Farmer to Consumer Direct "Sales to Pickle" Sales Center launched

सांगली : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या कृषी आत्मा विभागाअंतर्गत "विकेल ते पिकेल,' अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र सांगलीत सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात 23 मार्च ते 26 मार्च अखेर अभियान सांगलीत सुरु आहे. 

शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. बाजारपेठेचा कल ओळखून शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी "विकेल ते पिकेल' हे अभियान राज्य सरकारने सुरु केले असून ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास कृषी विभागाला आहे. आत्मा अंतर्गत विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र सांगलीतील जिल्हा न्यायालय इमारतीच्या पाठिमागे सुरु आहे. मंगळवारी "विकेल ते पिकेल अभियान शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीच्या ठिकाणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, उप विभागीय कृषि अधिकारी वेताळसाहेब उपस्थित होते. 

कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची सुविधा बहुतांश वर्गाला मिळाली; मात्र शेतकरी बांधवांसाठी ही सुविधा नाही. त्यांना शेतीत राबण्यावाचून पर्याय नाही. शेतकरी राबतात म्हणून जगाला अन्न मिळते. शेतात राबल्यानंतर येणाऱ्या पिकाला मातीमोल भाव मिळत असेल तर शेतकरी कसा जगणार? त्यासाठी "विकेल ते पिकेल' अभियान शासनाने सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी "विकेल ते पिकेल' संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

कृषीप्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. त्यासाठी शेतातून थेट शहरातल्या घरापर्यंत अशा प्रकारची साखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत. शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे. याचे नियोजन करुन महाराष्ट्रात विभागवार शेती करावी. दर्जेदार उत्पन्न घेऊन "विकेल ते पिकेल' ही संकल्पना यशस्वी करावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य वेळोवेळी निर्णय घेत आहे. 
 
एक दृष्टीक्षेप.... 
- शेतकरी गट संख्या-116 
- शेतकरी उत्पादक कंपनी संख्या-33 
- शेतकरी गटातील सदस्य संख्या-2264 
- शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य संख्या-10592 
- गटाकडून विक्री शेतमाल -896 टन 
- उत्पादक कंपनी विक्री शेतमाल -6125 टन 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com