जनावरांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्याचा गेला जीव!

dhanawde
dhanawde

म्हसवड : माण तालुक्यातील कुकुडवाड येथे गुरुवारी (ता. 2) दुपारी जनावरांना पाणी मिळत नसल्याने व जनावरांची धडपड पहावली नसल्याने विष्णू आप्पा धनवडे या शेतकऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुकुडवाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्र असलेल्या धनवडेवाढी हे छोटंसं गाव आहे.या छोट्याशा वाडीत अपुरा पाणी पुरवठा टँकरने सुरू होता.या वाडीच्या परिसरात कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.शासनाने मानसी 20 लिटर पाणी देण्याचे आदेशानुसार पाण्याचे वाटप होत आहे. त्यातूनही टँकर वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही तर जनावरांना पाणी पाजणे परिणामी कठीण झाले आहे.

दरम्यान, गुरुवारी विष्णू धनवडे यांच्या जनावरांना दोन दिवस तहान भागण्या इतके पाणी मिळाले नव्हते ते त्यांना पाहवत नव्हते म्हणून ते सायकली वरून पाणी मागण्यासाठी कुकुडवाड गावात ग्रामपंचायत कार्यालयात आले होते.त्या ठिकाणी पाणी मिळण्याबाबत चर्चा करून घराकडे परत जात असताना रस्त्यातच जनावरांच्या काळजीने हृदय विकाराचा धक्का बसला व ते सायकल वरून कोसळले व जागीच मृत्यू झाला अशी माहिती सुकृत दर्शनी मिळाली आहे.

शासनाने लोकसंख्या आधारित मानसी वीस लिटर पाणी देताना जनावरे व शेळ्या मेंढ्या यांचा विचार केलेला नाही.परिणामी अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने जनावरे पाण्याअभावी हंबरडा फोडत आहेत मात्र ही बाब कुणीही गांभीर्याने घेत नसल्याने कुकुडवाड व परिसरात नागरिकांचे बेकार हाल सुरू आहेत.माण तालुक्यातील प्रशासन तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी या परिस्थिती ची पाहणी करून जादा लोकसंख्या असलेल्या गावांना माणसे व जनावरे जगण्या इतपत पाणी पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

उरमोडी कॅनॉल शेजारील विहिरीचे अधिग्रहण करा!
उरमोडी कॅनॉलचे पाणी कुकुडवाड नजीक भाकरेवाडी येथे आले आहे त्यामुळे येथील विहिरींना पाणी आले असून त्या विहिरी अधिग्रहण करून ग्रामपंचायत मार्फत कुकुडवाड गावाला पाणी पुरवठा केल्यास मोठी मदत होणार आहे.त्यामुळे नागरिक व जनावरांचा जीव वाचणार आहे तरी याचा प्रशासनाने गंभीरपणे विचार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाने मानसी वीस लिटर पाणी देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ते पाणी माणसं व जनावरे यांना पुरत नसून जनजीवन विस्कळीत झाले आहे.परिणामी शेतकरी वर्गात ताणतणाव निर्माण झाला आहे.त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली आहे.तरी शासनाने पाणी वाढवून  दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे.
- सरपंच, शोभा जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com