बकऱ्याला वाचवायला घेतली ऊडी ; गमावला शेतकऱ्याने जीव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

बकऱ्याचा बुडून जीव जातोय हे पाहून शेवटी बाबूनेच विहिरीत उडी मारली; पण पोहता येत नसल्याने ते ही बकऱ्यासोबत बुडाले.

कोल्हापूर - बाबू कुंभार तेऊरवाडी (ता.चंदगड) ६५ वर्षाचे शेतकरी नेहमीप्रमाणे बकरी चारण्यासाठी डोंगरावर गेले होते. दुपारी चार वाजता ते बकऱ्यांना घराकडे घेऊन येत होते. दरम्यान गावाशेजारी असणाऱ्या रस्त्याकडेच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी तहानलेल्या बकऱ्याने अचानक उडी मारली.

पोहता येत नसुन ही बकऱ्या साठी विहिरीत उडी

 हे पाहताच कुंभार यांनी बादली व दोरखंडाने बुडणाऱ्या बकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण ते शक्‍य होत नव्हते आपल्या बकऱ्याचा बुडून जीव जातोय हे पाहून शेवटी बाबूनेच विहिरीत उडी मारली; पण पोहता येत नसल्याने ते ही बकऱ्यासोबत बुडाले. यावेळी जवळच असणाऱ्या एका महिलेने आरडाओरडा केला. उमेश दड्डीकर याने विहीरीत उडी मारून कुंभार याना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण विहिरीत प्रचंड पाणी असल्याने बकऱ्यासह कुंभार यांचा बुडून मृत्यू झाला. 

ऑगस्टमध्येच गेली होती पाच बकरी वाहून

कुटुंबावर ऑगस्टमध्ये मुसळदार पावसात ओढ्याला आलेल्या पाण्यातून बाबू कुंभार यांची पाच बकरी वाहून गेली होती. पुन्हा आज एका बकऱ्याने विहिरीत उडी मारल्याने त्याला वाचवताना कुंभार यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Died For Goat