कृष्णेच्या पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवले

कृष्णेच्या पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवले

म्हैसाळ - कृष्णेच्या पुरात वाहून जात असलेल्या अर्जुनवाडच्या शेतकऱ्याला म्हैसाळ येथील ग्रामस्थांनी वाचवले. आज सकाळी ही घटना घडली. गेले आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसाने कृष्णा नदीला पूर आला आहे.

शेतीच्या पाणी योजनांचे पंप पुरामुळे  पाण्याखाली जात आहेत. अर्जुनवाड ( ता.शिरोळ ) येथील शेतकरी गुंडू ढवळे हे नदीकाठी असणारा पंप काढायला आज सकाळी नदीत उतरले होते. लाकडी फळ्यांच्या प्लॅटफार्मवर प्लास्टीक बॅरेलच्या सहाय्यान वीजपंप तरंगत ठेवला होता. पण पाण्याचा वेग वाढू लागल्याने हा प्लॅटफार्म वाहून जाण्याची भिती होती. यासाठी ते पंप काढण्यासाठी गेले पण प्लॅटफार्म पाण्यात उलटला.

त्याबरोबर ढवळेही पाण्यात पडले. घाबरलेल्या ढवळे यांनी पाण्यात पडूनही प्रसंगावधान राखले. वीजपंपाचा प्लॅटफार्म गच्च धरुन ठेवला. प्लास्टीक बॅरेलमुळे ते तरंगत राहीले. पाण्याची गती खुपच असल्याने वेगाने वाहत म्हैसाळच्या बंधाऱ्याकडे ते खेचले गेले. सुदैवाने एका झाडात प्लॅटफार्म अडकला. त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरु केली. ती ऐकून नदीकाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

मनोज जाधव, विठ्ठल माने, लोभन्ना कांबळे, राकेश कांबळे, चंद्रकांत हेरवाडे यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेतल्या. वेगवान प्रवाहात पोहत जाऊन ढवळे यांच्या दिशेने दोरी टाकली. त्यांना बाहेर खेचून काढले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com