शेतकऱ्याचा मुलगा शिष्यवृत्तीत राज्‍यात प्रथम

अशोक तोरस्कर
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

उत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. विराज अमृत कुराडे असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे. विराजने ३०० पैकी २८६ गुण मिळविले.

शिष्यवृत्ती परीक्षेत यश आणि उत्तूरची जिल्हा परिषदेची कन्या व कुमार विद्यामंदिर शाळा हे समीकरण अलीकडे घट्ट झाले आहे. सात वर्षांत ६९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. या शाळेचे विद्यार्थी श्रेयस देशमाने, तन्वी शिवणे, विराज कुराडे यांनी सलग तीन वर्षे राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे शक्‍य झाले आहे.

विराजचे घर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतात आहे. शाळेत सकाळी सात वाजता तो सायकलवरून येतो. दोन तास शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास मार्गदर्शक शिक्षक घेतात. येताना आणलेला डबा दहा वाजता खाऊन पुन्हा ११ ते ५ पर्यंत नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो. यानंतर पुन्हा सायंकाळी ६ ते ८ शिष्यवृत्तीचे तास घेतले जातात. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. सेवाभावी वृत्तीने शिक्षक हे काम करतात.

विराजने भाषा व गणित विषयांत १४६ गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत १४० गुण मिळवले आहेत. पहिलीपासून तो विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रज्ञाशोध परीक्षेत व गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत त्याला यश मिळाले आहे.

Web Title: Farmer son in the first state scholarship