कुरुकलीत बैलजोडी बांधली रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मुरगूड - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला कुरुकली येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत मुरगूड-निपाणी राज्यमार्गावर बैलजोडी बांधून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली. या मार्गावर निढोरी येथेही रास्ता रोको करण्यात आला, तर मुरगूड शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून संपाला पाठिंबा देण्यात आला. 

कुरुकली (ता. कागल) येथे सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलनास सुरवात झाली. 

आज दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. निपाणी-देवगड राज्यमार्गावर कुरुकली येथे सकाळी आठ वाजता रस्त्यावरच बैलजोडी आणून बांधल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एक हजारपेक्षा अधिक वाहने थांबून राहिली. दरम्यान, साडेनऊ वाजता मुरगूड पोलिसांनी आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली, मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावत आंदोलन सुरूच ठेवले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रल्हाद पाटील, आर. डी. पाटील, आप्पासाहेब बेलवलकर, राष्ट्रवादीचे विकास पाटील, जयवंत पाटील, बी. जी. चौगले, गुलाब तिराळे, सदानंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, सखाराम तिराळे, तुकाराम जाधव, पंडित पाटील, राजेंद्र तेलवेकर, सुनील बेलवळेकर, व्ही. डी. पाटील, तुकाराम पाटील, रवींद्र शिंदे, रामचंद्र पाटील, विलास चौगले आदींनी सहभाग घेतला. 

आरटीओ गाडीही सुटली नाही 
या मार्गावरून धावणारी आरटीओची गाडीदेखील सुटली नाही. शेतकऱ्यांनी या गाडीला जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे गाडीतील अधिकारी व कर्मचारी गाडीत बसून राहिले होते. 

मुरगूडमध्ये बाजारपेठ बंद 
या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. एसटी वाहतूक पूर्णतः बंद होती. त्यामुळे बस स्थानक ओस पडले होते. 

मंगळवारचा आठवडा बाजार बंद 
मुरगूडचा उद्या मंगळवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन सदाशिव आंगज, दिगंबर भिलावडीकर, आनंद गोरुले, बाबासो पटेल, प्रशांत शहा, किरण गवाणकर, शशी दरेकर, धोंडिराम मकानदार, किशोर पोतदार यांनी 
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना दिले.

Web Title: farmer strike farmer band