दहिटणे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

वैराग - दहिटणे (ता. बार्शी) येथे अज्ञात कारणाने 75 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घराच्या अँगलला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अण्णासाहेब दगडू आंधळकर (वय 75), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आंधळकर गुडघेदुखी व मधुमेह आजाराने त्रस्त होते.

आजारपणाच्या खर्चासाठी ते वैराग येथे किराणा दुकान, तर कधी हॉटेल बारमध्ये काम करीत होते. याच कारणास्तव त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा मुलगा राजाभाऊ आंधळकर याने पोलिसांना दिली.

Web Title: farmer suicide