कर्जाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सांगली - कर्जाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील नागठाणे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. संपतराव शेळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

सांगली - कर्जाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील नागठाणे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संपतराव शेळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, घरापासून दोन किलोमीटर अंतरावर संपतराव शेळके यांचे शेत आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी सोसायटी आणि राष्ट्रीय बँकेचे साडे तीन लाख कर्ज त्यांनी काढले होते पण ते फेडणे अशक्य झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. 

Web Title: Farmer suicide incidence in Sangli district