कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

गडहिंग्लज - मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मिथुन आणाप्पा चिणगी (वय 25) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीला आली.

आज सकाळी मिथुन जनावरांना चारा आणण्यासाठी शेताकडे गेला होता; परंतु दुपारपर्यंत तो घरी आला नाही. साहजिकच नातेवाईक तेजगोंडा पाटील व मिथुनचा भाऊ पवन त्याच्या शोधासाठी शेताकडे गेले. त्यावेळी शेजारच्या गुराप्पा गुडगुडी यांच्या शेतातील झाडाला मिथुनने गळफास लावून घेतल्याचे दिसले.

पोलिस खात्यात असलेले मिथुनचे वडील आणाप्पा यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे बीकॉमची पदवी घेतलेल्या मिथुनवर शेती करण्याची तसेच कुटुंब पाहण्याची जबाबदारी पडली. चिणगी यांची एकरभर शेती आहे. गावातील सोसायटीतून शेती कामासाठी पीक कर्ज, तर गडहिंग्लजमधील एका बॅंकेत सोने तारण ठेवून मिथुनने कर्ज काढले होते. ही रक्कम लाखावर असल्याचे सांगण्यात आले. कितीही प्रयत्न केले तरी कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे तो कर्जाला कंटाळला होता. काही लोकांसमोरही तो या कर्जाबाबत निराश होऊन बोलायचा. अखेरीस आज त्याने गळफास लावून घेतल्याने कुटुंबासह गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे. त्याच्या मागे आई, दोन भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, तेजगोंडा यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून सहायक फौजदार खंडेराव कोळी तपास करीत आहेत.

Web Title: farmer suicide by loan wearily