700 एकर क्षेत्र क्षारपड झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

magalvedha
magalvedha

मंगळवेढा : तालुक्यातील रहाटेवाडी व तामदर्डी दरम्यान असणारा पूल गाळाने भरले आहे. या गाळात साचलेल्या पाण्यामुळे लगतच्या तीन गावातील तब्बल 700 एकर क्षेत्र क्षारपड झालेली असून संबंधित खात्याच्या निष्काळजीपणामुळे  या भागातील शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. 

या शहरातील जमिनीला जादा पाणी झाल्यामुळे असे प्रकार होत असतात. परंतु, या रस्त्यावरील पूल गाळाने भरल्यामुळे साठलेले पाणी लगेच जमिनीत मुरते. त्यामुळे जादा पाण्यामुळे जमिनी क्षारपड झाल्या आहेत. या भागातील रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लागावा लोकप्रतिनिधीला निवेदन दिले. खासदार बनसोडे यांनी हा प्रश्न लोकसभेत शुन्य प्रहार फेब्रुवारी 2015 मध्ये मांडला. तरीही चार वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांना पुलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे परंतु पुलाचा प्रश्न मात्र तसाच ठेवण्यात आला. पुलासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाला परंतु, या भागातील मातीच्या थराची  तपासणी केली असता माती खोलवर असल्याने एवढ्या निधीमध्ये या पुलाचे काम होणे शक्य नाही. त्यामुळे परत सुधारित अंदाजपत्रक करण्यात आले. हे अंदाजपत्रक साडे तीन कोटी पेक्षा अधिक असून एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद झाली नाही. सदरचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. या ओढ्यातील पाणी ओसंडून वाहत राहिले तर सध्याचे पडीक क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. आमदार भालके यांनी महसूल मंत्र्यांकडे निधी देण्याची मागणी केली. या पुलाच्या निधीस मंजुरी मिळाली नाही.  येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्यावरील पूल पडून अपघाताची शक्यता असून परिणामी पुन्हा जमीन याहीवर्षी पडीक ठेवावी लागणार का? सवाल या भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

''ओढ्यातील पुल गाळाने भरले असल्याने पाणी थांबल्याने तीन गावातील जमीन पडीक राहिली. या संदर्भात आ. भालकेच्या पुलासाठी निधी मंजूर झाला. पण जादा निधीसाठी पाठपुरावा केला पण, यासाठी निधी अद्याप मंजूर झालेला नाही. येत्या पावसाळ्यात हा पूल पडण्याची शक्यता आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर संबंधित खात्याला जाग येणार आहे का?''
- नितीन नकात, जि. प. सदस्य.

''मंत्री सडक योजनेतून तीन-साडेतीन कोटीच्या पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक डिव्हीजनल कार्यालयाकडून पुणे येथील मंडल कार्यालयाकडे जानेवारी महिन्यामध्ये पाठवण्यात आला आहे. निधी मंजूरी मिळताच कामास सुरूवात होईल.
- विलास ढेरे, शाखा अभियंता, मुख्यमंत्री सडक योजना

''वडिलोपार्जित ओढ्यालगतची पाच एकर जमीन गाळातील पाण्यामुळे खराब झाली असून परिणामी नदीवरून केलेल्या पाईपलाईनच्या हे पाणी वापरता येत नाही. पडीक जमीनीमुळे बँकेच्या कर्ज बोजा तसाच राहिला.''
- गोवर्धन पवार, रहाटेवाडी, शेतकरी

''काळ्या कसदार  जमिनीत रासायनिक खताच्या अति वापरामुळे तयार झालेले क्षार कमी पावसामुळे जमिनीवर येतात. शिवाय साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे क्षार वर येवून जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. तरी पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.''
- चंद्रकांत जांगळे मंडळ कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com