शेतकरी आणि जवान आपल्या देशाचे रक्षणकर्ते- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

शेतकरी आणि जवान हे आपल्या देशाचे खरे रक्षणकर्ते आणि पालनकर्ते आहेत, हे सांगुन पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
 

सातारा : शेतकरी आणि जवान हे आपल्या देशाचे खरे रक्षणकर्ते आणि पालनकर्ते आहेत, हे सांगुन पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोणंद नगरी मध्ये शरद कृषी महोत्सवाच आयोजन करण्यात आले असुन याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

शेतकऱयांना अधुनिक उपकरणांची माहिती व्हावी तसेच शेती पुरक व्यवसायाला चालना मिळावी याकरीता हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात जातीवंत खिलारी बैल, गाई, वेगवेगळ्या जातीच्या म्हैशी तसेच कृषी उपयोगी साहीत्य खरेदिची आणि पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. यावेळी बोलताना अजीत पवार यांनी शहिद जवानांना आदरांजली वाहिली.

Web Title: Farmers and Jawans Protector of our country says Ajit Pawar