'वसंतदादा' प्रशासनाविरूद्ध एकत्रित लढण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार, निवृत्त कामगार, उस पुरवठादार शेतकरी, सभासदांची संयुक्त बैठकीत विविध मागण्यांसाठी यापुढे एकत्रतपणे लढण्याचा निर्णय आज बैठकीत घेतला. कारखान्यावर प्रशासक नेमावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. 8) आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामकाजादिवशी "उपोषण' करण्यात येणार आहे.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वसंत सुतार, सुनिल फराटे, रावसो दळवी, सुरेश सादरे, एकनाथ कापसे, बाबुराव माळी, बाळासो पाटील, नामदेव जगताप आदी उपस्थित होते.

साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊसबिले, ठेवी अशी सुमारे 90 कोटी व कामगारांचे सन 2005 ते 10 काळातील 36 महिन्यांचा पगार, सन 2016 मधील दहा महिन्यांचा पगार, 2013-14 मधील ओव्हरटाईम, बोनस, जुलै 2015 पासूनची पगारवाढीच्या रकमा आजपर्यंत मिळाल्या नाहीत. 2002 पासून 2016 पर्यंत 1600 कामगार निवृत्त झाले. त्यांची ग्रॅच्युईटी, फंडाच्या रकमा मिळाल्या नाहीत. कारखान्याने 2008 पासून ही देणीही अहवालात दाखवली नाहीत. कारखान्याला लेखापरीक्षण खाते व साखर आयुक्तालयही सहकार्य करीत आहे, अशी टीकाही करण्यात आली.

Web Title: farmers and labor to fight together at vasantdada sugar