सात बाऱ्यासाठी शेतकरी पुरता मेटाकुटीला

हुकूम मुलाणी
रविवार, 17 जून 2018

मंगळवेढा : तालुक्यातील ऑनलाइन सात बारा मिळणे गेल्या महिनाभरापासून आॅफलाईन झाल्यामुळे कृषी खात्याच्या 20 जून मुदत असलेल्या हार्टीकल्चर योजनेपासून वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महसूल खाते कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जावू लागला.

मंगळवेढा : तालुक्यातील ऑनलाइन सात बारा मिळणे गेल्या महिनाभरापासून आॅफलाईन झाल्यामुळे कृषी खात्याच्या 20 जून मुदत असलेल्या हार्टीकल्चर योजनेपासून वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महसूल खाते कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जावू लागला.

शासकीय व बॅक खात्याच्या विविध कामासाठी व नवीन शैक्षणिक वर्षातील उत्पन्न न नाॅनक्रिमीलेअर दाखला, शेतकरी असल्याचा दाखल्यासाठी सात बारा उतारा आवश्यक असून या सात बारासाठी शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असून या सेवेचा तालुक्यात बोजवारा उडाला. गतवर्षी हवामानावर आधारीत फळ पिक विम्याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्याला पाच कोटीचा विमा मिळाला.तरी अनेक शेतकरी वंचीत राहिले. सध्या पीक विमा देखील ऑनलाइन केला असल्याने वेळेत ऑनलाइन करण्यासाठी यंदाचा डाळीब पिकाचा विमा मुदत वाढवून दिली असल्यामुळे अनेक शेतकरी या विमा योजनेत सहभागी होण्याची संधी आहे. शिवाय खरीप पिंक विम्यासाठी ही मुदत असल्याने यासाठी सात बाराची आवश्यकता आहे. पण सर्व्हर बंद असल्याने सात बारा मिळू शकत नाही. याशिवाय कर्जाचे नवे जुने, अन्य शासकीय कामासाठी शिवाय कृषी खात्याच्या रोहयो योजनेसाठी पण सात बारा नसल्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा कसा असा प्रश्न शेतकय्रांसमोर आहे. सध्या हे उतारे फक्त तलाठ्याकडेच मिळत असल्याने सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येवून शोधावे लागते. तलाठी रिक्त पदे व अतिरिक्त पदभार यामुळे तालुक्यात बसून अनेक गावाचा कारभार करताना तलाठीही बेजार झाले. किमान महिनाभर तरी तलाठ्याना नियुक्त केले केलेल्या गावात थांबण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे. वारवार सर्व्हर डाउन असल्यामुळे देखील महसूल खात्याला डोकेदूखी होवू लागले. ऑनलाईन कारभार केल्याचा दावा करणाय्रा महसूल खात्याने मनमानी कारभार करुन नाहक त्रास देण्याचा सपाटा लावला. 

ऑनलाईन सातबारा ऑफलाईन झाला, तालुक्याच्या ठिकाणी तलाठी सापडत नाही अशा परिस्थितीत कृषी खात्याच्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यामुळे. तालुक्यातील शेतकऱ्याला कुणी वाली नसल्याचे संतप्त शेतकरीच बोलू लागले आहेत.

Web Title: farmers are tense due to satbara