लढा दुष्काळाशी : डाळींबाच्या झाडांना गुंडाळल्या साड्या..! (व्हिडीओ)

Farmers are trying to save the pomegranate from drought in Vitthlapur Sangli
Farmers are trying to save the pomegranate from drought in Vitthlapur Sangli

विठलापूर (सांगली) : 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम सांगलीतील आटपाडी भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी करताना झाडांना साड्यांनी झाकलेली डाळींबाची बाग निदर्शनास आली. हा काय प्रकार म्हणून टीमने बागेतच असलेल्या बागेच्या मालकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना साड्यांनी झाडांना झाकल्याचे कारण कळले.

या भागात दुष्काळ पडला आहे. पाण्याची तर कमतरता तर आहेच पण तापत्या ऊन्हानेही कहर केला आहे. अशात डाळींबाची बाग जगवायची कशी? प्रखर ऊन्हानं डाळींबांवर काळे डागं पडलीत तर पीक वाया जायचं..? या प्रश्नांनी ग्रस्त या बागेच्या मालक-मालकीणीने विठलापूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पंढरपूर येथून 15 रुपयाला एक अशा साड्या खरेदी केल्यात आणि आपल्या डाळींबाच्या झाडांना झाकले. जेणेकरुन डाळींबाच्या फळांवर ऊन्हामुळे डाग पडू नये. 

पावसाचं प्रमाण कमी असल्याने या भागात पाणी कमी आहे. साधारण दोन लाखापर्यंत खर्च आलेल्या बागेतून एक लाख तरी नफा मिळावा अशी माफक अपेक्षा या बागेच्या शेतकरी मालकांनी व्यक्त केली. 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com