"सीना'तील शेतमाल पळविण्याची लगबग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नगर : सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेने आज आणखी गती घेतली. वाहनांची संख्याही वाढल्याने कामाचा उरक होता. त्यामुळे नदीपात्रातील शेतमाल हलविण्यासाठी शेतकऱ्यांनी पळापळ केली. मका, ऊस आदी शेतीमाल शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या वाहनांमधून हलविला. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी काल स्वत: नदीपात्रातील अतिक्रमित शेतीची पाहणी केली होती. 

नदीपात्रातून काढण्यात येणारा गाळ हलविण्यासाठी प्रशासनातर्फे आज डंपरची संख्या आणखी वाढविण्यात आली. कालपर्यंत साधारण दीड किलोमीटर नदीपात्र मोकळे करण्यात आले. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षांत नाल्याचे स्वरुप प्राप्त झालेली नदी या भागात पुन्हा नदीसारखी दिसू लागली आहे. नदीपात्रातील भराव काढल्याने साठलेल्या पाण्यालाही प्रवाहास मोकळीक मिळाली. महापालिकेने कालपर्यंत सीना नदीपात्रातून भराव घातलेली साधारण 800 ब्रास माती काढली. नदीपात्रात सुरु होणारी कारवाई एका ठरविक कालावधीत बंद पडून थांबते, असा आजवरचा अनुभव असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला दोन दिवस कारवाईकडे दुर्लक्ष केले. मात्र, मोहीम आता थांबणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आज पळापळ सुरु केली. 

"नदीपात्रातून निघणारा गाळ घेऊन जाण्यासाठी आज काही शेतकऱ्यांनी संपर्क केला. त्यांना माती घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. नदीपात्रातील निघणारा गाळ जास्त असल्याने आज दोन पोकलेन फक्त डंपरमध्ये माती भरण्यासाठी वापरले जात आहेत. त्यात डंपरची संख्या आता 32 पर्यंत पोचली आहे.'' 
- सुरेश इथापे, अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख, महापालिका. 

Web Title: farmers busy in shift material of farm