दुष्काळ अन् कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

टाकळी हाजी : गेल्या वर्षी दुष्काळाने ऊस जळाला, यावर्षी पावसाने शेतजमीन नापीक झाली, त्यातून बँकामधून काढलेल्या कर्जाचे व्याज वाढू लागले. या सर्व गोष्टीला कंटाळून शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी साबळेवाडी येथील बाळू सुखदेव चाटे (वय 50) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.  

टाकळी हाजी : गेल्या वर्षी दुष्काळाने ऊस जळाला, यावर्षी पावसाने शेतजमीन नापीक झाली, त्यातून बँकामधून काढलेल्या कर्जाचे व्याज वाढू लागले. या सर्व गोष्टीला कंटाळून शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी साबळेवाडी येथील बाळू सुखदेव चाटे (वय 50) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.  

मिळलेल्या माहितीनूसार, टाकळी हाजी साबळेवाडी येथे सुखदेव लिंबा चाटे यांचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबाने शेती व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढले होते. गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने ऊसाचे क्षेञ जळून गेले. त्यामुळे बँकेचे व्याज देखील भरता आले नाही. या वर्षी कांदा लागवड करुन उत्पन्नात भर पडेल अशी आशा होती. माञ, पावसाचा जोर वाढल्याने पिके पाण्यात गेली. त्यातून बँकाची वसूली ही त्यांच्या मते नैराश्याची गोष्ट होती. त्यामूळे या सर्व कर्जाला कंटाळून शनिवार (ता. 2) राञी साडेनऊच्या दरम्यान, त्यांचा कर्ता मुलगा बाळू चाटे याने विषारी औषध घेतले. त्यानंतर पुणे येथे वायसीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. शवविच्छेदन करण्यात आले असून महसूल विभागाने पंचनामा केला आहे. या कुटुंबाने शोकाकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार केले आहे. 

सूका ओला दूष्काळ              
गेल्या वर्षी पाऊस नसल्याने दूष्काळाचा सामना करावा लागला. तर या वर्षी ओला दूष्काळाचा अनुभव येऊ लागला आहे. कांद्याला बाजारभाव नसल्याने वडनेर ( ता. शिरुर ) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर कर्जाला कंटाळून  दुसरी आत्महत्या झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers committing suicide due to Wet drought and debt In Takali haji