सांगोल्यात डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेततळी घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

sangola
sangola

संगेवाडी (सोलापूर)  : सांगोला तालुक्यात डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेततळी घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकरी शेततळी घेत असला तरी अनेक शेतकऱ्यांना यासाठी शासकीय अनुदान मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केला.

यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बहार धरलेल्या डाळिंब बागांसाठी पाणीटंचाई जाणवु लागली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन धरलेले डाळिंब पाणीटंचाईमुळे हाती लागणार नसल्याने शेतकरी शेततळी घेत आहे. आपल्या क्षेत्रानुसार (झाडांच्या संख्येनुसार) छोटी-मोठी शेततळी शेतकरी घेत आहेत. शेततळी घेण्यासाठी पोकलेन मशीनची मागणी वाढली आहे. गरजेनुसार शेतकरी वाढीव दरानेही शेततळी घेत आहे. सध्या पोकलेनसाठी १७०० रुपयांपासुन २००० रुपयांपर्यंत (प्रतीतास) भाडे आकारले जात आहे. शेततळ्यांमुळे शेतकरी आपले थोडे- थोडे पाणी साठवुन गरजेनुसार बांगांना देता येते. बहार धरलेल्या बागांना शेततळ्यांचा फायदा होणार आहेच परंतु ऐन उन्हाळ्यात बागा जगविण्यासाठी मोठा वापर होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कसलेच पाणी नाही त्यांना बागा जगविणेही अवघड होणार आहे. शेततळ्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेततळी घेत आहेत.

शासनाने मागेल त्याला शेततळी देण्याचे जाहीर केले परंतु याचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासन स्थरावर याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत बागा जगणार नाहीत असे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तयार केलेल्या शेततळ्याच्या आकारानुसार अनुदान दिले जावे अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

माझ्याकडे साडेचार हजार डाळिंबाची झाडे आहेत. सध्या सर्व झाडांचा बहार धरला आहे. सध्या पाणी असले तरी पुढे डाळिंब परिपक्व होण्याच्या काळातच तीव्र पाणीटंचाई जाणवते त्यामुळे आताच पाणी साठवणुकीसाठी शेततळे घेत आहोत
- राजु खंडागळे, (डाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com