शेतकऱ्यांना चार महिन्यापासुन मिळेना दुधाला अनुदान

अक्षय गुंड  
सोमवार, 8 एप्रिल 2019

उपळाई बुद्रूक (सोलापुर) - यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने माळरान पडीक पडली आहेत. शेतात काहिच पिकले नाही. तर इतर ठिकाणीही पुरेसा चारा उपलब्ध नाही. प्यायला पाणी नाही तर, मुक्या जनावराला सांभाळयाच कसं. रानात गेले तर धरणीमाय खाल्ल्यागत वाटतं. चारा व पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीपुरक असलेला दुग्ध व्यवसाय सध्या भयानक अडचणीत. त्यात शासन शेतकर्यांची थट्टा करते की काय अशी परिस्थिती. दुष्काळी परिस्थितीत अनुदानाचे दाखवलेले गाजर अद्याप गेली ४ महिन्यापासुन शेतकर्यांना दिले नाही. त्यामुळे जगावे की मरावे हाच एक प्रश्न पडला आहे. अशा तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा दुग्ध व्यवसायाला बसत आहेत. पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच प्रकारच्या चार्यांचे भाव वाढले आहेत. कडब्याच्या एका पेंढीचा दर तब्बल २५ ते ३० रुपये तर उसाचे वाढे एका पेंढीला दर पाच ते सहा रुपये इतका झाला आहे. साऱ्या चे भाव वाढले असतानाच दुधाचे दर मात्र किरकोळच आहेत. पशुपालन करणे जिकारीचे झाले आहे. त्यामुळे दूध व्यवसाय आर्थिक अडचणीत असून आगामी काळात तर या व्यवसायाचा प्रवास खडतर होणार आहे. हे निश्चित. 

एकीकडे अनुदान वेळेत मिळत नाही त्यामुळे दूध उत्पादकांना तोटा होतो. तर उन्हामुळे दूध उत्पादनात घट सहन करावी लागत आहे. याचा फटका दूध धंद्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना बसत आहे. चाऱ्याच्या अडचणीमुळे जनावरे कवडीमोल भावाने विकली जात आहेत. जिरायती भागातील दरवर्षी विकला जाणारा कडबा यंदा शिल्लक नाही. ज्वारीच झाली नाही तर कडबा तर कुठून येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर ठिकाणाहून चारा विकत आणावा तर चाऱ्याचा खर्च वाहतुकीचा खर्च आणि प्रत्यक्षात दुधाला मिळणारा दर याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे चारा विकत आणणे हे देखील आर्थिक दृष्ट्या शक्य राहिलेले नाही.

सरकारने प्रतिलीटर दुधाला ता. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत २० दर व ५ रूपये अनुदान व १ मार्च पासुन २२ रूपये दर व ३ रूपये अनुदान जाहिर केलेले आहे. परंतु  २० डिसेंबर २०१८ पासुन अनुदानाचा एकही रूपये शेतकर्यांना देण्यात आला नाही. व त्यात १ एप्रिल पासुन पशुखाद्यात ५० रूपयाने वाढ केली आहे. दुग्ध व्यवसाय एवढा अडचणीत सापडला असताना शासन शेतकर्यांना जगू बी देत नाय अन् मरू बी देत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शेणखतापुरताच उरला दुग्ध व्यवसाय
१९७२ पेक्षा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. मात्र दुधाचे घसरलेले दर, चाऱ्यांचा गंभीर बनलेला प्रश्न, शासनाने थकवलेले अनुदान, जनावरांच्या औषधोपचारांचा वाढलेला खर्च, यामुळे दुधाचा धंदा मोडकळीस आला आहे. केवळ शेणखतापरताच हा धंदा राहिला असल्याचे मत शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन संकटात सापडलेले आहे. तरी शासनाने त्वरीत वाड्यावस्त्यावर टॅंकर सुरू करावेत. चारा छावण्या सुरू करून भयानक दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा. 
- संजय नागटिळक, सरपंच उपळाई बुद्रूक.

जनावरांच्या चार्यांबरोबर पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. दुग्ध व्यवसायाला आर्थिक अडचणीत सापडला. कवडीमोल भावात नागरिक जनावरे विकत आहेत. 
- पोपट निकम, शेतकरी उपळाई बुद्रूक

Web Title: farmers did not get subsidy for milk