नगर : मुळा नदीत शेतकरी बुडाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

संगमनेर (नगर) : मांडवे खुर्द येथील शेतकरी काल (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास पाय घसरून मुळा नदीत पडला. भाऊसाहेब कारभारी ढेंबरे (वय 40, रा. बिरेवाडी), असे त्यांचे नाव आहे. घटनेनंतर तब्बल 29 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही.

बिरेवाडी येथील भाऊसाहेब ढेंबरे, नीलेश बिरू डोमाळे यांच्यासह काही जण काल (शनिवारी) सकाळी मांडवे खुर्द शिवारातील मुळा नदीच्या हत्तीडोह परिसरातील विहिरीत वीजपंप सोडण्यासाठी गेले होते. काम झाल्यावर मुळा नदीत हातपाय धूत असताना, कठड्यावरून पाय घसरून ढेंबरे पडले व प्रवाहासोबत वाहून गेले. हे दृश्‍य पाहून डोमाळे घाबरून बेशुद्ध पडले. स्थानिकांनी त्यांना तातडीने साकूर येथील खासगी रुग्णालयात व नंतर संगमनेरला हलविले.

बिरेवाडीसह परिसरातील सुमारे 150 ग्रामस्थ शनिवारी सकाळपासून ढेंबरे यांचा शोध घेत आहेत; मात्र अद्याप ते सापडले नाहीत. तहसीलदार अमोल निकम, मंडलाधिकारी विवेक रासने व घारगावचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे, टाकळी ढोकेश्वरचे पोलिस कॉन्स्टेबल महादेव पवार आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers drown in mula river