शेतकऱ्यांना बसला दुध आंदोलनाचा फटका

हुकूम मुलाणी
गुरुवार, 19 जुलै 2018

मंगळवेढा - दुध दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असला तरी केवळ भविष्यातील लाभासाठी पशुपालकानी हा तोटा सहन तीन दिवसातील संपामुळे तालुक्यातील पशुपालकाचे सव्वा कोटी पेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले. अद्यापही तोडगा न निघाल्याने आंधळगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याने अॅड. राहूल घुले यांनी सांगितले.

आज नंदेश्वर येथे दुध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गरंडे, युवक नेते सुनिल गरंडे गणेश जोरवर,बंडू लोहार यांनी सरकारबद्दल जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. तर युवा शेतकरी सुनिल लवटे, पिंटु चव्हाण यांनी चक्क दुध दरवाढीसाठी दुधाने अंघोळ करून आपला रोष व्यक्त केला. दुध दरवाढीसाठी गावक-यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद करून रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.तर बोराळे गावात दूध दरासाठी रस्त्यावर दूध ओतून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला या वेळी गावचे सरपंच सचिन नकाते स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे युवक तालुका अध्यक्ष श्रीमंत केदार स्वाभिमानी छावा संघटनेचे तालुका प्रमुख अक्षय पवार स्वाभिमानीचे नंदूर शाखा प्रमुख शंकर संगशेट्टी बोराळे ग्रामपंचायत सदस्य अल्लाबक्ष कडलासकर क्षतृघन लोहार गणेश जगदाळे तसेच रमेश मुंगसे बाळासाहेब धनवे सचिन धनवे कुबेर चौगुले रमेश चव्हाण विष्णू बाबर सुभाष नकाते  राहुल पाटील हणमंत चव्हाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
फोटो नंदेश्वर ता मंगळवेढा येथे दुध दरासाठी आंदोलन करण्यात आले.

Web Title: Farmers Financial loss milk agitation