"एफआरपी'चा तिढा वाढला 

तात्या लांडगे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सोलापूर - केंद्र सरकारने यंदाच्या साखर हंगामासाठी "एफआरपी'त (किमान आधारभूत किंमत) टनाला 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल असून, "एफआरपी'साठी उसाचा पायाभूत उतारा 9.5 वरून 10 टक्‍के करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सरासरी उतारा 11.5 गृहीत धरून कारखानदारांकडून शेतकऱ्यांना दोन हजार 637 रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे दर जाहीर न केल्यास शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. 

यंदाच्या गाळप हंगामात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना जादा "एफआरपी' मिळावी, यासाठी शेतकरी संघटना आतापासूनच आंदोलनाच्या तयारी लागल्या आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना वाढीव दर देणे शक्‍य होण्यासाठी साखरेला किमान 3500 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळावा, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे. त्यामुळे 20 ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामापूर्वी पुन्हा एफआरपीचा तिढा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

...असा मिळेल वाढीव दर 
राज्यातील उसाला प्रतिटन 11.5 टक्‍के साखर उतारा गृहीत धरला, तर दोन हजार 775 रुपये आणि त्यात 1.5 टक्‍क्‍याचे 412 रुपये 50 पैसे मिळविल्यास तीन हजार 187 रुपये 50 पैसे एवढा "एफआरपी' होतो. त्यातून तोडणी-वाहतूक प्रतिटन 550 रुपये वजा केल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 637 रुपये "एफआरपी' मिळेल. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना राज्ये स्वत:चा उसाचा किमान दर (स्टेट ऍडव्हायझरी प्राइज) जाहीर करतात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे त्यांना आता त्यात वाढ करावी लागणार आहे. 

यंदाच्या हंगामातील अपेक्षित बदल 
- उसाचा सरासरी उतारा 10 टक्‍के हा पायाभूत धरून प्रतिक्‍विंटल 275 रुपयांची होणार वाढ 
- 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उतारा असल्यास प्रति 1 टक्‍का 275 रुपये वाढीव मिळणार 
- देशातील शेतकऱ्यांना सुमारे 83 हजार कोटी रुपये मिळणार जादा 
- 9.5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांकडून प्रतिक्‍विंटल मिळणार 271.25 रुपये 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. त्यानुसार कारखान्यांनी यंदाची एफआरपी जाहीर करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers get an additional FRP as per the Central Government's decision