लढा दुष्काळाशी : 'आज दुष्काळ असलेल्या मातीतून काढायचो मीठ' (व्हिडीओ)

Farmers had make salt from soil in Drought Area Atpadi sangli
Farmers had make salt from soil in Drought Area Atpadi sangli

आटपाडी (सांगली) : दुष्काळाने व्यापलेल्या या परिसरात एकेकाळी मीठ बनत होतं, असं जर सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार आहे का? नवल वाटतंय ना? आम्हालाही वाटलं...जेव्हा 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली कुटेवस्ती-शिवापूर, पुजारवाडी-दिघंची येथे. 

'इथल्या मातीतून आम्ही मीठ काढत होतो. ते रोजच्या जेवणात वापरत होतो आणि बाजारात हेच मीठ विकतही होतो.' असं सांगणारे शेतकरी रेवबा कुटे आम्हाला इथे भेटलेत. 'आज जरी इथं दुष्काळी भाग म्हणून बघत असाल तरी इथला सुकाळ आम्ही जगलाय..' असं त्यांनी 'सकाळ'च्या टीमला सांगितलं.

'पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातून येणाऱ्या खारी माती वेचायची. ती मडक्यात ठेवयाची, त्यात पाणी ओतून ते मडकं चुलीवर ठेवायचं आणि शिजवायचं...' अशी मीठ बनविण्याची प्रक्रीया या शेतकरी आजोबांनी सांगितली. 'गेली दोन वर्ष झालीत पण इथे पाऊस नाही. विहीरीलाही पाणी नाही. पाच दिवसांनी येणाऱ्या टँकरचं पाणी साठवून आम्ही पितो आणि जनावरांनाही पाजतो.' अशी निराशा हे आजोबा आणि उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com