शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचा गैरव्यवहार

हुकूम मुलाणी
गुरुवार, 12 जुलै 2018

मंगळवेढा - धुळे हत्याकांडामुळे नाथपंथी डवरी समाजावर झालेल्या अन्यायाचा वणवा शांत होण्याआधीच तालुक्यातील गणेश वाडी येथे याच समाजातील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन बनावट मालक उभा करुन विकण्याचा प्रकार उघडकीस आला.

मंगळवेढा - धुळे हत्याकांडामुळे नाथपंथी डवरी समाजावर झालेल्या अन्यायाचा वणवा शांत होण्याआधीच तालुक्यातील गणेश वाडी येथे याच समाजातील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन बनावट मालक उभा करुन विकण्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबतची तक्रार मनोज इंगोले रा कचरेवाडी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील गणेशवाडी येथील शामराव कृष्णा इंगोले यांचे नावे गट 204 क्षेत्र 1.06 इतकी जमीन असून सदरचा मालक भिक्षा मागण्यासाठी नवसार गुजरात येथे गेल्याचे पाहून त्यांच शेतकय्रांच्या नावावर गावातील बनावट व्यक्ती उभा करुन 797283569038 या क्रमांकाचे बनावट आधार कार्ड काढण्यात आले. याच आधार कार्डच्या माध्यमातून सदरची जमीन आसबेवाडीत शेतकय्रांला चार लाख सत्तर हजारात विकण्यात आली वास्ताविक पाहता मुळ मालकाच्या सातबारा 1980 च्या अगोदर असून बनावट आधार कार्डातील शेतकय्रांची जन्म तारीख 1990 आहे. तरी देखील दुयम निंबधक कार्यालयाने अर्थपुर्ण व्यवहाराने दुर्लक्ष केले. या व्यवहारात साक्षीदार व ओळखदार म्हणून सिध्देश्‍वर जाधव, आबासो लांडे,सुनिल चिंचोळे, सचिन लांडे यांना ओळख व साक्षीदार होण्याचे काम केले त्यावेळी हा मुळ मालक गावात आल्यानंतर त्याला आपली जमीनीची विक्री झाल्याचे समजले त्यांनी याबाबत जिल्हाधिकारीचे तक्रार अर्ज दिला मंगळवेढा येथील दुयम निंबधक कार्यालयात असे अनेक प्रकार घडत चालले असून केवळ अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे या प्रकाराची चलती असून यामध्ये डवरी, पुनर्वसन मध्ये अधिक बनावट खरेदी विक्रीचे प्रकार घडले आहे. यापुर्वीच्या दुयम निंबधक असलेल्यां कार्यकाळात झालेल्या व्यवहारापासून चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

खरेदी-विक्री संदर्भात नोटीस बजावण्यासाठी गेल्यावर त्या समाजात चौकशी केली. असता सदरची व्यक्ती परगावी गेल्याचे समजले. संशय वाटला अधिक चौकशी करून सदरची नोंद रद्द करण्यात आली.
रणजित मोरे, मंडल अधिकारी

Web Title: farmers land scam