ऐन दिवाळीत झेंडूने शेतकऱ्यांना रडवले; 150 कॅरेट झेंडू दिला फेकून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

सतत कमी-अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका झेंडू पिकांना बसला असून जास्त पाण्यामुळे आणि चिखलामुळे फुले खराब झाली आहेत.

मोहोळ : दिवाळी पाडव्याला आणि पूजेसाठी आवर्जून वापरल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांना सध्या कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच ग्राहकच झेंडूकडे पाठ फिरवत असल्यामुळे तो रस्त्यावर फेकून देण्याची दुर्देवी वेळ झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याचे विदारक चित्र आज पाडव्याच्या दिवशी पाहावयास मिळाले.  

- मी सांगूनही बँकेने मला जाणीवपूर्वक नोटीस दिली : धनंजय मुंडे

दिवाळीच्या सणासाठी खास करून झेंडूच्या फुलांची गरज लक्षात घेता साधारणतः तीन-साडेतीन महिन्यात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून अनेक छोटे मोठे शेतकरी जुलै, ऑगस्ट महिन्यात झेंडूची लागण करीत असतात. साधारणतः लागणीपासून ते काढणीपर्यंत मशागतीसह एकरी पन्नास हजार रूपये खर्च येतो; परंतु ग्राहकांची संख्या लक्षात घेता दसरा-दिवाळीला फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. खर्च वजा जाता चांगल्याप्रकारचा नफा झेंडू पिकामध्ये मिळतो.

- विरोधी पक्ष कसा असतो हे आता दाखवून देऊ : राजू शेट्टी

मात्र, यावर्षी सतत कमी-अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका झेंडू पिकांना बसला असून जास्त पाण्यामुळे आणि चिखलामुळे फुले खराब झाली आहेत. तर मार्केटमध्ये घेऊन गेलेल्या फुलांना पुढे ग्राहकच नसल्यामुळे व्यापाऱ्यांनीही हा माल घेतला नाही. परिणामी, नफा तर सोडाच, पण टेम्पोचे भाडेसुद्धा द्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हे सर्व चित्र वेदनादायी आहे. दत्तात्रय राऊत या शेतकऱ्याने 150 कॅरेट झेंडूची फुले रस्त्यावर दिली.

- 'आमदाराचे काम चंद्रकांत पाटील यांना समजत नाही'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers loss due to not getting rates to marigold in Diwali Festival

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: