पाटण तालुक्यात शेकोटी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा पाटण तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटी आंदोलनावेळी दिला.
 

पाटण (सातारा)- पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा पाटण तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटी आंदोलनावेळी दिला.

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. विक्रमबाबा पुढे म्हणाले पाटण तालुक्यात 7 जून पासून सलग अडीच महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. 15 जुलै पासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या वरून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात येते. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही .शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत.

याबरोबर, वन्य प्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत, म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Web Title: farmers movement in Patan Satara