हंगामानुसार पिकनिमा भरावा : डॉ. अजीतकुमार देशपांडे

राजकुमार शहा 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मोहोळ : जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व तीचा पोत टिकवुन ठेवण्यासाठी शेतक-यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय खताचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी हंगामानुसार पिक विमा भरावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेवा निवृत मृद शास्त्रज्ञ डॉ. अजीतकुमार देशपांडे यांनी केले.

मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात जगातीक मृदादिन साजरा करण्यात आला, त्यावेळी  उपस्थीत शेतकऱ्यांना डॉ देशपांडे मार्गदर्शन करीत होते. यावेळी सोलापूर येथील डाळींब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. जोस्ना शर्मा, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. तानाजी वळकुंडे, शास्त्रज्ञ डॉ. समदुर, विषय विशेषज्ञ काजल जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आशिष माईटी, तुषार आहिरे, दिनेश क्षीरसागर, अजय दिघे, तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांच्यासह परिसरातील शेतकरी, माहिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. शर्मा म्हणाल्या, शेतकऱ्यानी जास्तीत जास्त जीवाणु खतांचा वापर करावा , तरच शेती चांगली राहणार आहे . श्रीधर जोशी यांनी विद्यापीठाच्या व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.डॉ अशीष माईटी यांनी जमिनीचे प्रदुषण दुर करण्याकरीताच्या उपाय योजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

तुषार आहिरे यांनी माती पाणी परिक्षणासाठी माती नमुने घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविले व शेंद्रीय खत निर्मिती बाबत मार्गदर्शन केले. विषय विषेशज्ञ काजल जाधव यांनी माती परिक्षणानुसार खताच्या मात्रा देण्याबाबत मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन दिनेश क्षीरसागर यांनी करून डॉ तानाजी वळकुंडे यांनी आभार मानले.

Web Title: farmers should pay insurance as per period said ajitkumar deshpande