पुण्यात सुरू होणार सोलापूरचा आठवडी बाजार

पुण्यात सुरू होणार सोलापूरचा आठवडी बाजार

सोलापूर : पुण्यात झालेल्या "सोलापूर फेस्ट'ने माझा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूरचे मार्केटिंग करण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आठवडे बाजार सुरू केला जाणार आहे. हा बाजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चालविला जाणार असल्याची माहिती सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक सोलापुरात झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, नाबार्डचे अधिकारी प्रदीप झिले यांची प्रमुख उपस्थिती होती. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, वर्षात 52 आठवडे येतात. सोलापूर जिल्ह्यात 57 शेतकरी उत्पादक कंपनी आहेत. प्रत्येक कंपनीला वर्षातील एका आठवडे बाजाराची जवाबदारी देऊन हे नियोजन केले जाणार आहे.

विजापूर रोडवरील आरटीओ ऑफीस शेजारी असलेली कृषी विभागाची जागा पणन मंडळाला मिळाल्यास त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मॉल उभा केला जाईल असा विश्‍वासही त्यांनी दिला. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकरी, शेतकरी गट प्रमुख यांच्याशी सातत्याने संवाद साधावा. या संवादाच्या माध्यमातून नवीन व वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले. 

कृषी पर्यटनासाठी महत्वाचे प्रयत्न 
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात कोणालाही फुकट हुरडा खाऊ घालू नये. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यात पाचशे कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा आपला मानस आहे. गावातील ज्या शेतकऱ्यांची शेती चांगली आहे. फार्म हाऊस चांगले आहेत त्यांनी त्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र सुरू करावे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मंदिरांचेही मार्केटिंग करावे. भाविकांना प्रसाद व महापूजा सुरू करून त्याचेही मार्केटिंग करावे असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com