खासदार शेट्टींचे शेतकरीप्रेम बेगडी - विनय कोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

टोप -  वारणा कारखान्याचा गळीत हंगाम लवकर सुरू केला म्हणून दंडात्मक कारवाईची मागणी करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा आरोप जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केले. 

भादोले जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनीषा माने व पंचायत समितीचे उमेदवार डॉ. प्रदीप पाटील यांच्या प्रचारार्थ येथे सभा झाली या वेळी ते बोलत होते. सरपंच धनश्री दौलत पाटील अध्यक्षस्थानी होत्या. 

कोरे म्हणाले, ""सभासदांच्या पाठबळावर वारणेची घोडदौड सुरू आहे. ऊस उत्पादकांच्या विनंतीवरून कारखान्याचा गळीत हंगाम लवकर सुरू केला. त्यावेळी शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवणाऱ्या खासदारांनी कारखान्यावर दंडात्मक कारवाईची मागणी केली. हा दंडाचा भार कारखान्याने शेतकऱ्यांकडूनच वसूल करावा लागला असता; मात्र भाजप सरकारने हा दंड माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळेच आज जनसुराज्य भाजप आघाडीबरोबर आहे.'' 

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जनसुराज्यच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन कोरे यांनी केले. 

सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित असलेला टोप खाणीचा प्रश्‍न मिटवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विजयसिंह माने यांनी या वेळी सांगितले. 

वारणेच्या पाण्यामुळे टोपमधील शेती फुलली आहे. त्याची परतफेड मतांच्या माध्यमातून येथील जनता करेल. त्यामुळे जनसुराज्यच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास सरपंच धनश्री पाटील यांनी व्यक्त केला. 

जिल्हा परिषदेच्या उमेदवार मनीषा माने, पंचायत समितीचे उमेदवार डॉ. प्रदीप पाटील, लक्ष्मण अवघडे, डॉ. कल्लेश्‍वर मुळीक, आनंदा भोसले यांची भाषणे झाली. दौलतराव पाटील, पिलाजी पाटील, केरबा पाटील, पंडित पाटील, लक्ष्मण पाटील, बापू पोवार, पी. एन. तोडकर, राजेंद्र माने, दिलीप गुरव, राजेंद्र वाघमारे, अमोल कांबळे उपस्थित होते. 

Web Title: Farmers spurious love Shetty