सोयाबीन बियाण्याच्या परमीटसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पुणतांबे : अनुदानित सोयाबीन बियाण्याचे परमीट घेण्यासाठी शेतकऱ्यांना राहात्याला जावे लागते. त्याऐवजी ही सोय येथेच करून, होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पुणतांबे : अनुदानित सोयाबीन बियाण्याचे परमीट घेण्यासाठी शेतकऱ्यांना राहात्याला जावे लागते. त्याऐवजी ही सोय येथेच करून, होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पुणतांबे परिसरात तीन-चार दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सोयाबीनचे बियाणे खरेदी करीत आहेत. कृषी विभागातर्फे शेतकऱ्याला या बियाण्याची एकच अनुदानित गोणी दिली जाते. त्यासाठीचे परमीट घेण्यासाठी राहात्यात जावे लागते. परमीटसाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. पुणतांब्याला कृषी सहायक असूनही त्यांची भेट होत नसल्यामुळे योजनांची माहिती मिळत नसल्याची तक्रार रस्तापूर येथील साहेबराव बनकर यांनी केली आहे. 

Web Title: Farmers' strugling for soyabean permits