दुष्काळी परिस्थितीने शेतकरी त्रस्त

हुकूम मुलाणी 
बुधवार, 2 जानेवारी 2019

मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलेच घेरले असून, प्रशासकीय उदासिनताही आहे. चाऱ्याअभावी पशुधन संकटात सापडले असून, हिरव्या चाऱ्यासाठी लावलेला मका मात्र लष्करी आळीच्या विळख्यात सापडला. त्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भविष्यात भटकंती करावी लागत आहे.

मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलेच घेरले असून, प्रशासकीय उदासिनताही आहे. चाऱ्याअभावी पशुधन संकटात सापडले असून, हिरव्या चाऱ्यासाठी लावलेला मका मात्र लष्करी आळीच्या विळख्यात सापडला. त्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भविष्यात भटकंती करावी लागत आहे.

ऑक्टोबर महिन्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला. आद्यपी यासाठीच्या उपाय योजना फक्त कागदावर आहेत.  हालचाली सुरू असल्याचे दाखवून शेतकऱ्यांना सोयीस्कर रित्या गंडवण्याचा प्रकार होत असल्याने  प्रशासनाविरोधात लोकप्रतिनिधीसह विविध संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यांची देखील सवय झालेल्या प्रशासनाने मात्र आपल्याच सोयीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. तालुक्यांमध्ये लहान आणि मोठे मिळून 92 हजार इतके पशुधन आहे. या आकडेवारीत शेळ्या मेंढ्या संख्या गृहित धरली नाही. दक्षिण भागातील बहुसंख्य शेतकऱ्याकडे शेळ्या व मेंढ्या असल्याने ही पण आकडेवारी त्यामध्ये गृहीत धरण्यात यावे पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील 14 पशुवैद्यकीय दवाखाना मार्फत जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून बियाण्याचे वाटप करण्यात आले परंतु पाण्याअभावी काही शेतकऱ्यानी या बियानाचा वापर केला नाही ज्यांनी पेरले ते आळीच्या विळख्यात सापडले. याबाबत खातरजमा न करता या विभागाने मार्चअखेर 9800 मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला असला तरी प्रत्यक्षात एक हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तर दुष्काळ आणि हुमनीने बाधीत ऊस देखील लवकर गाळपास जात आहे. शासकीय आकडेवारीनुसार डिसेंबर अखेर पुरेल इतका चारा होता नवीन वर्षापासून काय करावे हा गंभीर प्रश्न उभा आहे. चाऱ्याअभावी शेतकऱ्यांनी जनावराला सांगोल्याचा बाजार दाखवला सध्या जनावराचे किमती देखील कमी झाल्या अशा परिस्थितीत चारा छावण्या किंवा डेपो या वादात प्रशासन मात्र टोलवा टोलवी करीत आहे. सध्या सुधारीत पशुगणना करून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हुमनीबाबत ऊसाला भरपाई दिली नाही. शासनाने बियाणे देताना किड व्यवस्थापन करणे आवश्यक होते. चाऱ्यासाठी लावलेली पिकेही किडीच्या भक्षस्थानी पडली. पंचनामे करून भरपाई तातडीने द्यावी. 
- अनिल बिराजदार स्वाभिमानी शेतकरी संघटना

दुष्काळात चाय्रासाठी लावलेली मका लष्करी आळीच्या भक्षस्थानी पडल्याने जनावरासमोर चाय्राचा प्रश्न निर्माण झाला. चाऱ्यासाठीच्या शासकीय उपाय योजना कधी करणार बाळासाहेब ढगे भाळवणी

Web Title: Farmers suffer from drought conditions