Video : तुमच्या काळजात होईल चर्रर्र... बळीराजा नको करू आत्महत्या...लेक गात होता कविता, तरी बापाने केली आत्महत्या

Farmer's suicide at Pathardi
Farmer's suicide at Pathardi

पाथर्डी ः कर्जमाफी, कर्जमुक्ती हा सगळा गलबला खोटारडा आहे. पाथर्डी तालुक्यात झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुलगा शेतकरी राजा आत्महत्या करू नकोस अशी आर्त आळवणी कवितेतून करीत होता. त्याच रात्री डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने बाप आत्महत्या करतो...

अशी करूण कहाणी भारजवाडीत घडली. तिसरीतील चिमुरड्याने मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी ही कविता गायली होती.

मल्हारी बटुळे यांनी बँकेच्या अधिका-यांच्या धमक्याला घावरुन आत्महत्या केल्याचा आरोप बटुळे कुटुंबीयाने केला आहे. सेंट्रल बँकेचे ट्रक्टरचे वाहन कर्ज व इंडोनेशिया बँकेचे ट्रकसाठी घेतलेले कर्जाचा बोजा व मुलीच्या लग्नासाठी उसनवारीने घेतलेले पैसे बटुळे याच्याकडे होते.

सेवा सोसायटीचे कर्ज २०१७ साली माफ झालेले आहे. त्याचा दाखलाही त्यांना देण्यात आलेला होता.मात्र, बटुळे यांनी ट्रक घेतली होती. ती चोरीला गेल्याची तक्रार २४ फेब्रुवारी २०२० रोजी पोलिसात दिली आहे. शनिवारी तहसीलदार नामदेव पाटील यांनी भारजवाडी येथे भेट दिली.

बटुळे कुटुंबाकडुन प्राथमिक माहिती घेतली. त्याचा अहवाल पाटील यांनी जिल्हाधिका-यांना पाठविला आहे. सुटीचा दिवस असल्याने बँकेचे कर्जाबाबतची ठोस माहती मिळाली नाही.  


लेकाची हाक त्याने एेकलीच नाही
प्रशांतने कवितेतून बळीराजाला आत्महत्या करू नको अशी आर्त हाक दिली होती. मात्र, आपलेच वडील आत्महत्या करतील असे त्याला वाटले नव्हतं. मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रशांतने बळीराजाच्या आत्महत्येबाबत कविता सादर केली होती. त्याच रात्री प्रशांतचे वडील मल्हारी बटुळे यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.

मायेच्या गौरवदिनी बापाच्या फरफटीची कविता

भारजवाडी येथे ह्रदय पिळवटुन टाकणारी घटना घडली. प्रशांत बटुळे  हा भारजवाडीच्या प्राथमिक शाळेत शिकतो. प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिनाचा कार्यक्रमाचे आोजन करण्यात आले होते. त्यावेळी वडीलांच्या काबाड कष्टाबाबतचे स्वतःचे निरीक्षण म्हणून त्याने कविता केली होती. ती त्याने गाऊनही दाखविली होती. बळीराजाचे दुःख मोठे असले तरी त्याने हबकून न जाता धिराने सामोरे जावे व आत्महत्या करु नये अशी कविता केली. त्याच रात्री प्रशांतचे वडील मल्हारी यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यामुळे भारजवाडी गावावर शोककळा पसरली.

कर्जाचा बोजा झाला होता

मल्हारी यांचे वडील बाबासाहेब बटुळे यांनी सेंट्रल बॅक व इडोनेशिया बँकचे कर्ज आहे. तसेच बहिणीच्या लग्नासाठी हातउसने पैसे कसे मिटवावे हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मागील वर्षी दुष्काळामुळे शेतात उत्पन्न झाले नाही. चालू वर्षी ही शेती पिकली नाही. बँकेचे अधिकारी तगादा करायचे म्हणूनच माझ्या मुलाने आत्महत्या केली असे त्यांचे वडीलांनी सांगितले.

भारजवाडी येथील  हनुमाननगर शाळेतील इयत्ता तिसरीमधील प्रशांत बटुळे याने शेतकऱ्यानी आत्महत्या करू नये म्हणून एक कविता रचली होती. त्यातील काही अोळी अशा... 

शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप

आरे बळीराजा नको करू आत्महत्या

पैसे नसुनही शाळेत शिकवता लेकर

कसे उन्हात करतात शेती

पिक उगवणी मिळतात पैसे

शेती करुनही तुझ्या हाताला फोड

आरे बळीराजा नको करू आत्महत्या

या कवितेच्या गायनानंतर आपलेच वडील आत्महत्या करतील, असे प्रशांत वाटलं नाही. या दैवदुर्विलासाबद्दल जो तो हळहळ व्यक्त करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com