तासगाव तालुक्‍यातील शेतकरी दिल्ली आंदोलनात

Farmers in Tasgaon taluka in Delhi agitation
Farmers in Tasgaon taluka in Delhi agitation

तासगाव (जि. सांगली) : दिल्ली येथे केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शन आंदोलनात तालुक्‍यातील शेतकरीही सहभागी झाले आहेत. काही तर संघटनांच्या विविध बैठकांतही सहभागी झालेत.

जिल्ह्यातील बारा-पंधरा जण आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. 
दिल्ली येथे आठ दिवस पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याला विरोधासाठी आंदोलन सुरू आहे. देशातील विविध राज्यातील शेतकरी सहभागी होत आहेत. आता हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे.

या शेतकरी आंदोलनात तासगाव येथील संदीप गिड्डे, सावर्डे येथील वैभव शिंदे हे स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील बारा - पंधराजण आंदोलनासाठी गेले आहेत. विविध राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तासगावच्या शेतकऱ्यांच्या सहभागाने लक्ष वेधून घेतले आहे. 

विशेष म्हणजे हे दोघे म्हणजे केवळ आंदोलनात सहभागी झाले नाहीत तर विविध बैठका, चर्चेत सक्रिय सहभागी झाले आहेत. द्राक्ष आणि बेदाण्यांच्या माध्यमातून तासगवकर शेतकरी देशभरात पोहोचले आहेत. पण द्राक्ष शेतकरी चक्क दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. 

दिल्लीतील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या अन्य राज्यातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. मात्र अजून पुरेशा प्रमाणात रेल्वे सारख्या सुविधा सुरू झाल्या नसल्याने शेतकरी इकडे येऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी तासगावच्या संदीप गिड्डे यांनी व्यक्त केली. एकूण तासगावतील शेतकरी थेट दिल्लीतील आंदोलनात पोहोचल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष आंदोलनाकडे लागले आहे हे नक्की. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com