दर मिळत नसल्याने शेतमाल फेकला रस्त्यावर

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 27 जून 2018

शिराळा : केळी, टोमॅटो, मिरची अशा भाजीपाल्याचे दर कोलमडल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिरच्या व टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. ते टोमॅटो जनावरांचे खाद्य बनले आहेत. महागाई वाढली पण शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्याकडून व्यापारी कमी दराने भाजीपाला खरेदी करून ज्यादा दराने विकून मालामाल होऊ लागले. मात्र शेतात राबणारे शेतकरी कंगाल होत आहेत.

टोमॅटो 12 रुपये, मिरची 15 रुपये, केळी 7 रुपये दराने दलाल घेत असल्याने उत्पादन खर्च अंगावर येऊ लागला आहे. आत्ता पावसाळा सुरु झाल्याने मला खराब होत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दर कमी आणि माल खराब होत असल्याने शेतकरी टोमॅटो, मिरची रस्त्यावर फेकू लागले आहेत. मजुरांची कमतरता आणि त्यांची मजुरी यामुळे प्लॉटधारक आर्थिक विवेनचनेत सापडला आहे.

तीस गुंठ्यात टोमॅटोबाग आहे
दलाल किलोला 120 पर्यंत दर देत असल्याने उत्पादन व प्रवास खर्च ही अंगावर येतोय. व्यापारी बाजारात माल घेऊन गेल्यास 25 किलोच्या कॅरेट मध्ये दोन किलो तूट धरतात. 7 रुपये किलोने केळी खरेदी केली जाते. त्यांचे मनमानी दर सुरु असल्याने नाईलाजास्तव माल विकण्यापेक्षा रस्त्यावर फेकावा लागतो.

विश्वास औताडे (टोमॅटो प्लॉटधारक)

दोन टन मिरच्या रस्त्यावर
 एका एकरात मिरची लावली आहे. दलालाकडून बाजारात 15 रुपये किलोने मिरची खरेदी, मजूर कमतरता, पाऊस यामुळे मिरच्या पीकून कुजू लागल्या आहेत. पावसामुळे त्या वाळवता येत नाही. त्यामुळे जवळपास दोन टन मिरच्या रस्त्यावर टाकाव्या लागल्याने 80 हजाराचे नुकसान झाले आहे.

रुपेश फोंडे (मिरची प्लॉटधारक)

Web Title: farmers thrown vegetables on road because less price