ई-ठिबक संकेतस्थळावरील बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ

हुकूम मुलाणी
रविवार, 29 जुलै 2018

मंगळवेढा : प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या ई-ठिबक या संकेतस्थळावर अनुदानासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेत असणारी खाते ग्राहय धरले नसल्यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बु. व निंबोणी या परिसरातील शेतकऱ्यांची अन्य बॅकेत खाते काढण्यासाठी पळापळ होवू लागली आहे. पुर्वीप्रमाणे बॅक ऑफ इंडीया पुरस्कृत असलेल्या या बॅकेचे खाते ग्राह्य़ धरण्यात यावे अशी विंनती शेतकरी करत आहे.

मंगळवेढा : प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या ई-ठिबक या संकेतस्थळावर अनुदानासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेत असणारी खाते ग्राहय धरले नसल्यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बु. व निंबोणी या परिसरातील शेतकऱ्यांची अन्य बॅकेत खाते काढण्यासाठी पळापळ होवू लागली आहे. पुर्वीप्रमाणे बॅक ऑफ इंडीया पुरस्कृत असलेल्या या बॅकेचे खाते ग्राह्य़ धरण्यात यावे अशी विंनती शेतकरी करत आहे.

या योजनेतील लाभाचे अनुदान थेट बॅक खात्यात जमा होत असल्यामुळे धनादेश काढण्यासाठी होत असलेली अडचण व वटणावळीचा वेळ कमी झाला. विविध योजनेतील अनुदान थेट बॅकेत जमा होवू लागल्याने लाभार्थ्याची चांगली सोय झाली. तालुक्यातील लवंगी, शिरनांदगी, मारोळी, आसबेवाडी, सलगर बु, सलगर खु, शिवनगी, सोडडी, बावची, पौट, जित्ती, जंगलगी, चिक्कलगी, रडडे, निंबोणी, भाळवणी, जालीहाळ, पौट ही गावे आर्थिक व्यवहार व कर्ज प्रकरणासाठी लीड बॅकेने बॅक ऑफ इंडीयाशी सलग्न असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेला जोडले. तालुक्यात सलगर बु व निंबोणी या दोन ठिकाणी शाखा असून या गावातील लोकांचे बॅक व बॅक मित्राच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होत असून बॅक मित्राच्या माध्यमातून घरातच पैसे मिळू लागल्याने ही बॅक या गावाला फायदेशीर ठरु लागली. नदीकाठचा भाग वगळता तालुक्यातील शेतकऱ्यांचा विशेषता दुष्काळी दक्षिण व पश्चिम भागाचा ओढा ठिबक सिंचनकडे ओढा वाढला. कृषी खात्यानेही संबंधित शेतकऱ्यांचे अनुदान थेट बॅक खातेवर वेळेत जमा करून दिले.

 गॅस, ठिंबक अनुदानसह घरकुलाचे अनुदानही थेट बॅक खात्यावर जमा होते. पण अचानक ही बॅक संकेतस्थळावर दिसत नसल्यामुळे सध्या प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या नवीन लाभार्थ्यासाठी अन्य बॅकेत खाते काढण्याचे सांगण्यात आले. अन्य बॅकांनी तुमचे गाव त्याच बॅकेला जोडले असल्याचे सांगतिले जात असल्यामुळे या लाभार्थ्याची चांगलीच गैरसोय होवू लागली आहेे. केंद्राच्या अन्य योजनेचे पैसे जमा होत असल्यामुळे ठिबक सिंचन लाभासाठी पुर्वरत ही बॅक ग्राहय धरावी अशी मागणी होत आहे.

"विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेत माझे खाते असून आता नवीन खाते काढण्यासाठी अन्य ठिकाणी जाणे वयोवृध्द असल्यामुळे गैरसोयीचे होत आहे याच बॅकेचे खाते पुर्वीप्रमाणे ग्राहय धरावे ''
- नागेश येडवे लाभार्थी

"सदरच्या बॅकेचे नाव या योजनेत समाविष्ट करणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल. ''
- नामदेव गायकवाड, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Farmers in trouble due to changes on e-drip on the website