सोलापूर : विमा कंपनीने चुकीचे निकष लावून वगळल्याने शेतकरी चिंतेत

सोलापूर : विमा कंपनीने चुकीचे निकष लावून वगळल्याने शेतकरी चिंतेत

मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील खरीप हंगामातील तीन हजार चाळीस हेक्टरवरील 4012 तूर उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने चुकीचे निकष लावून वगळण्यात आल्याने कोट्यवधींच्या नुकसानीने शेतकऱ्यांतून चिंतेचे वातावरण पसरले. विमा कंपनीच्या पक्षपाती धोरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

खरीप हंगाम 2018 साठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे तालुक्यातील मरवडे, भोसे, आंधळगाव, मारापुर, बोराळे, मंगळवेढा, हुलजंती या महसूल मंडलमधून बाजरी, तूर, सूर्यफूल, कांदा, उडीद आदी पिकाचा विमा बँकेत व सी.एस.सी सेंटरवर भरला.

दरवर्षी जून-जुलैमध्ये मिळणारी भरपाई लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का असेना यंदा मार्चमध्येच बाजरी व सुर्यफूलाचे विमा मिळाल्यामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी पैसे उपलब्ध झाले. तुरीसाठी मोठ्या प्रमाणात विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला होता. परंतु बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर विमा कंपनीने 'तुरी' ठेवल्यामुळे ते अद्याप भरपाईपासून वंचित असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आमदार भालकेंनी विधानसभेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी आंदोलन केले तर जि.प. शैला गोडसे यांनी मुंबई शिवसेनेच्या मोर्चामध्ये निवेदन दिले. यामध्ये 70 टक्केपेक्षा अधिक लोकांची भरपाई विमा कंपनीने दिले. परंतु उर्वरित लोकांना ज्यादा क्षेत्र व बनावट प्रस्तावाच्या नावाखाली वगळण्यात आले. 

वास्तविक पाहता विमा प्रस्ताव दाखल करताना सातबारा उतारा तलाठी पीक-पाणी दाखला जोडला असताना ज्यादा क्षेत्र कसे होणार या प्रस्तावाची त्याच वेळेला पडताळणी करणे आवश्यक होते. परंतु कृषी खात्याने दिलेल्या पिक पेरा अहवालाच्या आधारे या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. खरीप हंगामातील  सर्वच पीकाची भरपाई मिळणे अपेक्षित असताना विमा कंपनीने मात्र बाजरी आणि सुर्यफूलाचे विमा देऊन शेतकऱ्यांना समाधान केले. तालुक्यातील निवडक तूर उत्पादक शेतकय्रा ला भरपाई देऊन उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम विमा कंपनीने केले.

ज्यादा क्षेत्र नसतानादेखील बाजरी आणि सूर्यफुलाची भरपाई दिली आणि तुरीची वगळली तक्रारीसाठी गेल्यावर विमा कंपनीने तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली वास्तविक पाहता प्रस्ताव दाखल केल्यावर चौकशी करणे अपेक्षित होतं पण भरपाई देण्याची वेळ आल्यावर वेळ काढू धोरण विमा कंपनीने अवलंबले.

परमेश्वर आवताडे, शेतकरी, लेंडवेचिंचाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com