शेतकऱ्यांची ऊस शेतीला बगल देत डाळींब शेतीला पसंती

pomegranate
pomegranate

मंगळवेढा - नदीकाठच्या ऊस पटयात सध्या ऊसाच्या दरातील तफावत आणि उशिरा मिळणारी बिले पाहता शेतकऱ्यांनी ऊस शेतीला बगल देत डाळींब शेतीला पसंती दिली. तालुक्यातील अरळी येथील दत्तात्रय कदम व प्रदीप कदम या उच्च शिक्षीत बंधूनी 15 एकर डाळींब पिकाची लागवड केली.

दुष्काळी तालुक्यात चार साखर कारखाने असले तरी अलिकडच्या काळात तालुक्यात डाळींब शेतीचे क्षेत्र वाढत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कौठळी येथे पाणी नसल्याचे सदरची जमीन पडीक ठेवून अरळी 15 एकर जमीन घेतली. दत्तात्रय कदम या एम.ए.इंग्लीश शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षित तरुणांने नोकरी मागे न लागता भीमा नदी काठी असलेल्या ऊस बागायत शेती न करता नवीन प्रयोग करण्याच्या दृष्टीने सिमला मिरची,भेंडी,शेतीतील उत्पादित मालाची निर्यात करत असताना उत्पादनावर नियंत्रण ठेवणे तसेच उत्पादन क्षमता व दर्जा वाढीवणे ह्या हेतूने स्वतः डाळिंब शेती करण्यासाठी तयार झाले त्यासाठी डाळिंब शेतीचा अभ्यास करण्यासाठी इस्राएल देशाचा दौरा केल्यामुळे तेथील तंत्रज्ञान व आपली स्थानिक परिस्थीती यांची सांगड घालत जागतिक दर्जाची डाळिंब शेती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.त्यांना त्यांचे लहान बंधू प्रदीप कदमचे सहकार्य लाभले.त्यांच्याकडे असलेल्या 15 एकर जमीन  6000 झाडे असून त्यामध्ये सात एकराची आंबेबहारसाठी  2000 झाडांमध्ये अंदाजे 50 टन उत्पादन अपेक्षित आहे.उरलेल्या 8एकर क्षेत्रात (4000 झाडे) मृग बहारसाठी नियोजन केले 

दर वर्षी माती परीक्षण करून खतांचे नियोजन करुन वेळोवेळी झाडांचे निरीक्षण करत त्यानुसार विविध खताच्या मात्रा दिल्या. न कुजलेल्या शेणखतामुळे बरीच रोगराई बागेत येते.अशा शेणखताचा कर्ब-नत्र गुणोत्तर असमतोल असल्याने त्याचे विपरीत परिणाम होतात.कुपोषित झाड हे रोगांचे माहेरघर असते म्हणून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या उद्देशाने दर वर्षी प्रति झाड 30-40 किलो कुजलेले शेणखत दिले. झाडांच्या पोषणासाठी लागणारी खते दिल्यावर त्यांचे झाडाकडून शोषण होते का नाही यासाठी 70% सेंद्रिय व 30% रासायनिक असे संमिश्र पद्धतीने खत व्यवस्थापन केले.प्रतिबंधात्मक उपयांमध्ये ट्रायकोडेर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, ई.एम, मेटारायझीयम, बव्हेरीयम अश्या विविध जैविक बुरशी व कीटक नाशकांचा नियमित वापर केल्यामुळे झाडाची वाढ होते.पाण्यासाठी डबल ड्रीप लाइनचा वापर केला.जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या अवस्थेनुसार वापसा अवस्था पाहून पाण्याचे काटेकोर नियोजन केले.अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्याने अगदी प्रतिकूल अशा वातावरणात ऊस पट्ट्यात डाळिंबासाठी साक्षेप आद्रता 60-70% च्या वर राहल्याने तेल्याचा धोका होण्याची शक्यता असताना यात भरगोस व दर्जेदार उत्पादन घेण्यात यश आले.

सन  2015-16 च्या हंगामात त्यांना 40 टन डाळिंब यूरोपला निर्यात करण्यात यश आले.नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व एकात्मिक नियोजन केल्यामुळे प्रति झाड 40-50 किलो दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नांमध्ये त्यांना डाळिंब राष्ट्रीय संशोधन केंद्र (सोलापूर) येथील डॉ. ज्योत्सना शर्मा ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com