फरोख कूपर यांनी उलगडली आपली यशाेगाथा

फरोख कूपर यांनी उलगडली आपली यशाेगाथा

सातारा ः पूर्वज आणि आईवडिलांचा उद्योजकीय, सामाजिक जाणिवेचा वारसा मला मिळाला आहे. तो वारसा मी पुढे नेत आहे. सर्वांच्या सदिच्छांमुळेच यशस्वी झालो, असे मत कूपर उद्योगसमूहाचे प्रमुख फरोख कूपर यांनी व्यक्त केले.
 
श्री. कूपर यांच्या 75 व्या वाढदिवस जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा करण्यात आला. त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बजाज उद्योगसमूहाचे अध्यक्ष राहुल बजाज, रूबी हॉल क्‍लिनिकचे डॉ. परवेझ ग्रॅंट व डॉ. बोमी बोट या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री. कूपर यांच्या यशस्वी 75 वर्षांच्या जीवनावर आधारित एक छोटा जीवनपट सादर करण्यात आला.

त्या वेळी ग्रॅंट मेडिकल फॉउंडेशनचे अध्यक्ष राहुल बजाज यांना ग्रॅंट मेडिकल फाउंडेशनतर्फे गरिबांसाठी चालवत असलेल्या वैद्यकीय मदतीच्या उपक्रमाला हातभार म्हणून श्री. कूपर यांच्याकडून देणगीचा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास)च्या वतीने श्री. कूपर यांना मानपत्र देण्यात आले. कूपर कामगार व कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य पुष्पहाराने श्री. कूपर, मारुख कूपर व मनीषा कूपर यांचा सत्कार करण्यात आला. श्री. ग्रॅंट, सौ. कूपर व मनीषा कूपर, तसेच परदेशी पाहुणे पॉल कनोबल यांनी मनोगत व्यक्त केले.

नक्की वाचा -  हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत

सत्काराला उत्तर देताना श्री. कूपर म्हणाले, ""लोकांच्या सदिच्छांमुळेच मला नवनवीन संधी मिळाल्या. जीवनात यशस्वी झालो. मी आज माझ्या संघाचा कर्णधार असून, संघाशिवाय कर्णधार पदाला काही अर्थ नसतो.'' लालचंद हिराचंद व वालचंद हिराचंद यांनी आम्हाला एक छोटी लेथ मशिन देऊन तिचा उपयोग करण्यास सांगितले आणि तेथून सुरू झालेल्या उद्योगाचा ऐतिहासिक प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचप्रमाणे मी एस. एल. किर्लोस्कर व सी. एल. किर्लोस्कर यांना एका अडचणीच्या वेळी भेटायला गेलो. त्या वेळी अरुण किर्लोस्कर व सी. एस. किर्लोस्कर यांनी मला क्रॅन्क फॅक्‍टरी चालू करण्यास मदत दिली.

आज 40 वर्षांनंतरही आम्ही कमिन्सला क्रॅन्क पुरवत आहोत. 1992 मध्ये माझे आजोबा धनजीशा कूपर यांनी सातारारोड येथे पहिले डिझेल इंजिन बनवले. आता सुद्धा शंभर वर्षांनंतरही आम्ही अत्याधुनिक इंजिन बनवत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा -  शाब्‍बास... अंध युगंधराने मारली बाजी
 
श्री. कूपर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजमाता कल्पनाराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, माजी पोलिस महासंचालिका मीरा बोरवणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, तसेच नागरिक, उद्योजक, शासकीय अधिकारी, कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीषा कूपर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com