वडिलांच्या वाढदिवसाला वाटली मातीची भांडी! 

परशुराम कोकणे 
बुधवार, 4 एप्रिल 2018

उन्हाळा वाढला आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. शक्‍य असल्यास थोडेस धान्यही ठेवावे. पप्पांच्या वाढदिवसानिमित्त मातीची भांडी भेट म्हणून दिल्याने एक वेगळे समाधान मिळाले आहे. पप्पांसह कुटुंबातील सदस्यांनाही हा उपक्रम खूपच आवडला आहे. 
- विनय गोटे, पर्यावरणप्रेमी

सोलापूर : घरातल्या कोणत्याही सदस्याचे वाढदिवस असले की हॉटेलमध्ये जाऊन बर्थ सेलिब्रेशन केले जाते. तरुण वर्गात तर हजारो रुपये खर्चून खरेदी, पार्टी आणि बरचं काही होताना दिसत असताना सोलापुरातील वालचंद महाविद्यालयात बायोटेक्‍नॉलॉजी शिकणाऱ्या विनय गोटे या पर्यावरणप्रेमी तरुणाने मात्र वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याकरिता मातीची भांडी विनयने भेट म्हणून दिली आहेत. 

विनयचे वडील महादेव गोटे हे जिल्हा न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात श्री. गोटे यांचा वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त विनयने एक वेगळा उपक्रम राबविला. पक्ष्यांकरिता पाणी ठेवण्याकरिता विनयने कुंभाराकडून मातीची भांडी बनवून घेतली. पर्यावरणप्रेमी, मित्र परिवारासह शेकडो लोकांना त्याने मातीची भांडी भेट म्हणून दिली आहेत. विनयसह त्याचे वडील महादेव गोटे, आई रजनी गोटे, बहीण शिवानी गोटे हेही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले आहेत. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे. 

उन्हाळा वाढला आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. शक्‍य असल्यास थोडेस धान्यही ठेवावे. पप्पांच्या वाढदिवसानिमित्त मातीची भांडी भेट म्हणून दिल्याने एक वेगळे समाधान मिळाले आहे. पप्पांसह कुटुंबातील सदस्यांनाही हा उपक्रम खूपच आवडला आहे. 
- विनय गोटे, पर्यावरणप्रेमी

Web Title: father birthday celebration in Solapur