सोलापूर : मुलासह वडीलांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुलाला पोहायला शिकवत असताना 13 वर्ष मुलाचा व वडीलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.

केम (सोलापूर) : मुलाला पोहायला शिकवत असताना 13 वर्ष मुलाचा व वडीलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.

ही घटना मलवडी (ता. करमाळा) येथे शनिवारी (ता. 9) सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. मुलगा सार्थक शिवाजी कोंडलकर (वय 13) व वडील शिवाजी भीमराव कोंडलकर (वय 35) असे मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, सकाळी सातच्या सुमारास वडील शिवाजी कोंडलकर हे मुलगा सार्थक यास घरापासून 400 फुट अंतरावर असलेल्या विहारीवर पोहायला शिकवायला घेऊन गेले. मुलाला पोहायला शिकवत असताना मुलाच्या कंबरेला बांधलेली दोरी तुटली. त्यानंतर मुलाला वाचवण्यासाठी वडीलांनी उडी घेतली. त्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पोहायला गेलेला मुलगा व पती कसे आले नाहीत म्हणून पत्नी पहायला गेली असता ही घटना उघड झाली असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आठ मोटर लावून पाणी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father dies with child in solapur district

टॅग्स