अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या बालिकेचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

शहर पोलिसांच्या कौशल्याने चार दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सोहन शामराव भोसले ( वय 27 रा. हनुमाननगर, सांगली) यास शुक्रवारी पोलिसानी अटक केली. 

सांगली : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षाच्या पूर्वा संदिप काकडे या बालिकेला झोपत नसल्याच्या कारणावरुन लाथा बुक्‍यांनी मारहाण करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथे घडली.

शहर पोलिसांच्या कौशल्याने चार दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सोहन शामराव भोसले ( वय 27 रा. हनुमाननगर, सांगली) यास शुक्रवारी पोलिसानी अटक केली. याबाबत शहर उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी माहिती दिली. या प्रकरणी पुर्वाचे वडील संदिप संभाजी काकडे (रा. माने प्लॉट, हरिपूर रस्ता सांगली ) याने फिर्याद दाखल केली. पुर्वाचे वडील संदीप आणि आई राणी हे स्वतंत्र रहात होते. आरोपी सोहन हा आचारी काम करतो. त्याचे राणीशी अनैतिक संबंध होते. सोमवारी रात्री तो राणीच्या घरी आला होता.  त्यावेळी राणी काही कामानिमित्त त्याच्या भावाकडे गेली. चार मुली घरातच होत्या. सोहन याने सर्वांना झोपायला सांगितले. त्याच्या धाकाने तिघीजणी झोपल्या. सोहन याने त्यांना पांघरुण काढून झोपा असे दटावणीच्या सुरात संगितले. त्याचे ऐकून पूर्वा सोडून अन्य दोघी झोपल्या परंतु पूर्वा हिने डोक्‍यावरुन पांघरुण घेतला. याचा सोहनला राग आला. पूर्वा ऐकत नसल्याचे पाहून त्याने तिच्या पोटात लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये पुर्वाचा मृत्यू झाला.

Web Title: father killed daughter in Sangli

टॅग्स