निवृत्त पोलिस हवालदार पित्याने मुलाला ठोकला सॅल्यूट

Mohol
Mohol

मोहोळ : निवृत्त पोलिस हवालदार पित्याने आपल्या मुलाला पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदवीदान दीक्षांत समारंभ झाल्यानंतर स्टार ओपन केल्यावर मारला अभिमानाने सॅल्यूट. त्यावेळी मात्र, त्यांना आनंदाश्रु आवरता आले नाहीत, तर पापरी ग्रामस्थांनीही गावातील ग्रुपच्या माध्यमातुन नूतन पोलिस उपनिरीक्षक नितिन भोसले यांना मारला ऑनलाइन प्रेमाचा सॅल्यूट.!

पापरी येथील नितिन प्रकाश भोसले हे सन 2015 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाचा प्रशिक्षण कार्यकाल यशस्वी रित्या पूर्ण केला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दीपक केसरकर, रणजीत पाटील, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत नाशिक येथे 817 उपनिरीक्षक पदाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या नूतन पोलिस उपनिरीक्षकांचा दीक्षांत पदवीदान सोहळा पार पडला.

या 817 नूतन पोलिस उपनिरीक्षकांचे माता पिता, नातलग, मित्र परिवार या दीक्षांत समारंभास उपस्थित होते. नितिन यांच्याशी दूरध्वनी वरुन संवाद साधला असता ते म्हणाले लवकरच आमची कर्तव्य बजावण्यासाठी. पोलिस ठाण्यात नेमणूक केली जाईल, मी माझ्या पदाचा वापर प्रामाणिक पणे सर्वसामान्य नागरिकांच्या  समस्या सोडविन्यासाठी करेन.

नितिन भोसले हे सन 2007 मध्ये पोलिस दलात भरती  झाले आहेत, 2009 ते 2015 या कालावधीत त्यांनी ए टीएस पथकातही काम केले आहे, ठाणे, मुंबई येथील फोर्स वन मध्येही त्यांनी  सेवा बजावली  आहे. आता .पापरी गावात त्यांच्या या यशाचे कौतुक होत असून, गाव त्यांच्या आगमनाची वाट पाहत आहे,  ही बातमी कळताच पापरीत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली .

मी ज्या खात्यात सेवा बजावली आहे त्याच खात्यात माझ्यापेक्षाही उच्च पदावर माझा मुलगा कार्यरत झाल्याने, मला मोठा आनंद झाला आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण आहे, कष्टाचे चीज झाले.
- प्रकाश भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com