भिती नको; तीन महिने पुरेल इतका राज्यात धान्यसाठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली  : राज्यात धान्याचा तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा असून नागरिकांनी त्याचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

सांगली  : राज्यात धान्याचा तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा असून नागरिकांनी त्याचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

हे वाचा : ब्रेकिंग...त्या नऊ रूग्णांची प्रकृती स्थीर

राज्यमंत्री कदम म्हणाले,"" सध्याची स्थिती तात्पुरती आहे. काही दिवसच नागरिकांनी त्रास सहन करावा. धान्याचा साठा करु नये. पुरेसा धान्यसाठा आहे. आरोग्याच्या दृष्टीने शासनाने काही निर्णय घेतले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील द्राक्ष, फळे, भाजीपाला आदिंच्या बाबतीत अत्यावश्‍यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व वाहतूक सुरळीत चालू राहील याबाबत प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत आहे. धान्य वाटप लवकरच सुरळीत सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा सर्वजणच या बिकट परिस्थितीत झोकून देवून काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या निर्देशांची पायमल्ली करू नये व घराबाहेर पडू नये. शेतीमालाच्या वाहतूकीत कोणताही अडथळा होऊ नये यासाठी राज्य व केंद्र शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच प्रशासनानेही याबाबत अंमलबजावणी सुरू केली आहे. तहसिलदार स्तरावर अशा कृषि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पासेस देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करीत आहे.''

हे वाचा :  सांगली पोलिस देणार संचारबंदी काळात प्रवासाचा ऑनलाईन परवाना

ते म्हणाले,"" मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्‍यक वस्तू यांची जास्त किंमतीने विक्री करू नये. असे आढळले तर त्याच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. खासगी डॉक्‍टर्स यांनी त्यांची हॉस्पीटल, दवाखाने लोकांसाठी उघडीच ठेवावेत. भारती हॉस्पीटल कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक यंत्रणा, मनुष्यबळ, निधी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.''
.......  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear not; Cereals in the state last for three months