तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाअंर्तगत पोलिसांचा सत्कार 

प्रा. प्रशांत चवरे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

भिगवण - उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनावरील वाढत्या ताणांमध्ये त्यांचे मनोधैर्य वाढावे व पोलिस करत असलेल्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुने सकाळच्या वतीने सुरु केलेल्या तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांना चिकी व फळांचे वाटप करण्यात आले. यामाध्यमातून आम्ही तुमच्या कार्याला सलाम करतो अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

भिगवण - उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनावरील वाढत्या ताणांमध्ये त्यांचे मनोधैर्य वाढावे व पोलिस करत असलेल्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुने सकाळच्या वतीने सुरु केलेल्या तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांना चिकी व फळांचे वाटप करण्यात आले. यामाध्यमातून आम्ही तुमच्या कार्याला सलाम करतो अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

गोविंदा, गणेशोत्सव, गौरी, मोहरम आदी एकापाठोपाठ येणाऱ्या सणांमुळे पोलिस प्रशासनावर मोठा ताण येतो. अनेकदा त्यांना सणासुदीच्या काळात घराकडेही जाता येत नाही. पोलिस प्रशासनाच्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुन सकाळच्या वतीने तंदुरुस्त बंदोबस्त ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी कल्ब ऑफ भिगवणच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्यामध्ये चिकी व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, अॅंड. महेश देवकाते, शंकरराव गायकवाड, आबासाहेब देवकाते, धनाजी थोरात, अण्णासाहेब धवडे, संपत बंडगर, सरंपच लता चोपडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश गांधी, पोलिस उपनिरीक्षक भानुदास पवार उपस्थित होते. 

याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड म्हणाले, बंदोबस्ताचा पोलिस प्रशासनावर मोठा ताण असतो ही वस्तुस्थिती आहे परंतु अशाही स्थितीमध्ये नागरिकांची साथ व मिळाल्यास हा ताण निश्चित कमी होईल. चिकी वाटप हा उपक्रम निश्चितपणे पोलिसांचे मनोधैर्य वाढविणारा आहेत. यावेळी अॅड. महेश देवकाते, प्रदीप वाकसे, मिनाताई बंडगर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन बोगावत, सुत्रसंचालन महेश शेंडगे, आभार प्रवीण वाघ यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन संजय खाडे, डॉ. अमोल खानावरे, पप्पु भोंग, प्रदीप ताटे, औदुंबर हुलगे, किरण रायसोनी आदींनी केले.

पोलिसांनी व्यक्त केली सकाळप्रती कृतज्ञता
पोलिसांवर कामाचा ताण असतो ही बाब सकाळने पहिल्यांदा समाजाच्या लक्षात आणुन दिली आहे. तंदुरुस्त उपक्रमांमुळे समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला असुन सणाच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडे लोक आदराने पाहु लागल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली व सकाळचे याबद्दल आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Felicitated police in pursuit of tandurusta bandobast