मुलींच्या खूनप्रकरणातील महिला दोषी, सरकारतर्फे फाशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सोलापूर : आरोपी भारती राठोड हिला तिच्या काजल आणि सोनाली या मुलींच्या खूनप्रकरणी मंगळवारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. पाटील यांनी दोषी ठरवले. त्यामुळे सरकारी पक्षातर्फे आरोपी भारती हिच्या फाशीची मागणी करण्यात येत आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ३० ऑगस्ट होणार आहे.

22 नोव्हेंबर 2015 सकाळी साडे अकराच्या सुमारास आरोपी भारती (वय 28) रा. तेरा मैल, ता. दक्षिण सोलापूर हिने अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या तिच्या दोन पोटच्या मुलींची सुरीने निघृण खून केला. तसेच स्वतःवर देखीलवार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीचा दीर महादेव राठोड (वय 35) याने मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामधील प्रत्यक्षदर्शी बाल साक्षीदार दिपा राठोड (वय 11) हिची साक्ष आणि वैशाली राठोड (वय 15) यांची साक्ष महत्वाची ठरली. 

सरकारी पक्षाचा युक्तीवाद आणि प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी भारती हिला दोषी मानले. त्यावर आता शिक्षेसंदर्भात 30 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आरोपी महिलेस जन्मठेप होणार की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी तर आरोपी तर्फे अॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले.

Web Title: Female convicts in the murder of girls, death sentence by the government