बेळगाव शहरात जिल्हा रुग्णालयासमोर सापडले स्त्री अर्भक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

बेळगाव -  तीन ते चार दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून सोडून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 28)  रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील प्रसूतीगुहासमोर हा प्रकार घडला आहे.

रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महांतेश गंगाप्पा अंबडगट्टी याला प्रसूती विभागाच्या समोरील झाडाच्या कट्टयावर बेवारस पिशवी दिसली. सुरक्षा रक्षकाने पिशवीत पाहिले असता त्यात शर्ट आणि टी शर्टमध्ये गुंडाळून ठेवलेले नवजात अर्भक दिसून आले. हे बघून सुरक्षा रक्षकाला धक्का बसला.  त्याने लगेचच याबाबतची माहिती एपीएमसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

अर्भकाला अति दक्षता विभागात ठेवले आहे. या अर्भकाच्या अंगावर प्लास्टिक गुंडाळण्यात आले असून अर्भकाचा जन्म घरात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ज्या गावात महिलेची प्रसूती झाली आहे, मात्र तिच्याकडे मुल नाही, असे कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female infant found in front of district hospital in Belgaum city