सांगली जिल्ह्यात खते, बियाणे, किटननाशक दुकाने बंदला प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

सांगली,  ः सोयाबीन बियाची उगवण न झाल्याबद्दल दुकानदारांवर गुन्हे दाखल करणे तसेच अन्य मागण्यांबाबत कार्यवाहीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील साडेसहा हजारहून अधिक कृषी, कीटकनाशके, खते विक्रेत्यांच्या बंदला आज पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. संघटनेच्या राज्य संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद जिल्ह्यातील विक्रेत्यांनी दिलाय 

सांगली,  ः सोयाबीन बियाची उगवण न झाल्याबद्दल दुकानदारांवर गुन्हे दाखल करणे तसेच अन्य मागण्यांबाबत कार्यवाहीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील साडेसहा हजारहून अधिक कृषी, कीटकनाशके, खते विक्रेत्यांच्या बंदला आज पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. संघटनेच्या राज्य संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद जिल्ह्यातील विक्रेत्यांनी दिलाय 

संघटनेने विविध मागण्यांसाठी 10 ते 12 जुलै काळात दुकाने बंदची हाक दिली आहे. राज्यभरात सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. बियाणे न उगवल्यानंतर सबंधित कंपनी आणि विक्रेत्यावही गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रत्यक्षात आम्ही बियाणांची विक्री करतो. सुटे बीयाणे विकतच नाही. परिणामी याला केवळ कंपन्यांना जबाबदार धरावे, विक्रेत्यांना जबाबदार धरु नये, अशी मागणी राज्याचे कृषी आयुक्त यांना संघटनेने यापूर्वीच केली आहे. राज्याचे कृषिमंत्री यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेतली. परंतु शासनस्तरावरून विक्रेत्यांवरील अन्यायकारक कार्यवाही थांबवण्यात आली नाही किंवा रद्द करण्यात आलेली नाही. वास्तविक हे बियाणे सर्व नियमांचे पालन करून विक्रेते विक्री करताहोत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याशिवाय विक्रेत्यांकडून तपासणीसाठी बियाणे नमुन्यांची 15 वर्षांची सुमारे पंधरा कोटीपेक्षा शासनाकडून जादा येणे असलेली रक्कम परत मिळावी. वापराची मुदत संपलेली कीटकनाशके उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांकडून परत जमा करून घेणे, परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यांमध्ये एकाच दराने आकारणी करणे, दुकानातील साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्यास मान्यता देणे आदी मागण्या कृषी विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दुकानदारांच्या निधनानंतर सबंधित दुकानाचा परवाना त्यांच्या वारसांनाच द्यावा, अशीही मागणी केली आहे. 
संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना सांगली ग्रीकल्चर इन्पूटस्‌ डिलर्स असोसिएशने कृषी विक्रेत्यांच्या मागण्याबाबत अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष संजय निलावर यांनी दिले. 

 

" जिल्ह्यातील सोयाबीनच्या उगवणीबाबत आलेल्या तक्रारीवरून मी स्वतः तपासणी करतो आहे. बीयाणांची उगवण क्षमता सर्वसाधारण 65 टक्के च्या दरम्यान असल्याचे स्पष्ट होत आहे.' 
बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer, seed, pesticide shops closed in Sangli district